शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

नववर्ष सेलीब्रेशनला नोटबंदीचा फटका

By admin | Updated: December 29, 2016 23:55 IST

एरव्ही मावळत्या वर्षाला निरोप व उगवत्याचे धुमधडाक्यात स्वागत करण्यासाठी आठ ते दहा दिवसांपासून नियोजनात गर्क असलेल्या सामान्य नागरिकांनी यंदा नोटबंदीमुळे आपल्या उत्साहाला

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 29  एरव्ही मावळत्या वर्षाला निरोप व उगवत्याचे धुमधडाक्यात स्वागत करण्यासाठी आठ ते दहा दिवसांपासून नियोजनात गर्क असलेल्या सामान्य नागरिकांनी यंदा नोटबंदीमुळे आपल्या उत्साहाला मुरड घालण्याचे ठरविले असून, त्याचाच भाग म्हणून की काय ‘थर्टीफर्स्ट’साठी तयारीत असलेल्या हॉटेल्स, रेस्टॉरंट, लॉन्सचालकांनीही हात आखडता घेत मनोरंजनाचे कार्यक्रमच रद्द करण्यावर भर दिला आहे. दरवर्षी थर्टीफर्स्ट झोकात साजरा करणाऱ्यांच्या तयारीचा अंदाज घेऊन विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट, लॉन्समध्ये ३१ डिसेंबरच्या उत्तररात्रीपर्यंत मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यात आॅर्केस्ट्रा, नृत्याचे प्रकार, करमणुकीचे प्रयोग यांसह जेवणावर व मद्यपानावरही विशेष सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो, साधारणत: पाचशे ते पाच हजार रुपयांपर्यंतचे तिकीट आकारून ठेवलेल्या या कार्यक्रमांना ग्राहकांचाही तितकाच प्रतिसाद मिळत असल्याने असे कार्यक्रम आयोजित करण्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट चालकांमध्ये चढाओढही लागते. गेल्या वर्षी शहर व जिल्ह्यातील काही मोठ्या हॉटेल्सने अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले त्याची संख्या बाराच्या आसपास होती व आठ हॉटेल्सचालकांनी थर्टीफर्स्टला काहीच कार्यक्रम ठेवले नसल्याचे प्रतिज्ञापत्र शासनाच्या करमणूक विभागाला करून दिले होते. यंदा मात्र नोटबंदीचा फटका थर्टीफर्स्टच्या उत्साहाला बसला आहे. ग्राहकांमध्ये उत्साहच दिसत नसल्याने थर्टीफर्स्ट ‘कॅश’ करण्यासाठी सरसावणारे हॉटेल्सचालकांनी माघार घेतली आहे. जिल्हा करमणूक विभागाकडे फक्त तीन हॉटेल्सचालकांनी करमणुकीचे कार्यक्रम सादर करण्यासाठी अशा प्रकारची अनुमती मिळण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत, तर वीसहून अधिक हॉटेल्स, रेस्टॉरंट, लॉन्स चालकांनी कोणतेही कार्यक्रम सादर केले जाणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र भरून दिले आहे. तिकीट विक्रीतून करमणुकीचे कार्यक्रम सादर केल्यास शासनाला २० टक्के करमणूक कर शुल्कापोटी महसूल मिळतो.  मद्यपरवान्याचाही परिणाम३१ डिसेंबर रोजी मद्यपानासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याकडून एक दिवसाचा परवाना दिला जातो, यंदा मात्र शासनाने अशा प्रकारचा परवाना न देण्याचे ठरविले आहे, त्यातच महामार्ग व राज्यमार्गावरील परमीट रूम व बिअर बार यांच्यावरही शासन निर्बंध लावत असल्यामुळे हॉटेल्सचालकांनी ३१ डिसेंबर रोजी नियमित व्यवसाय करण्याचे ठरविल्याने कार्यक्रम घटल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)