दिंडोरी तालुक्यात बँक संपामुळे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 06:50 PM2021-03-16T18:50:36+5:302021-03-16T18:51:09+5:30

दिंडोरी : बँक खाजगीकरणाच्या विरोधात दोन दिवस पुकारण्यात आलेल्या बंदमुळे दिंडोरी तालुक्यातील बँकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत.

Bank strike in Dindori taluka halts operations | दिंडोरी तालुक्यात बँक संपामुळे कामकाज ठप्प

दिंडोरी तालुक्यात बँक संपामुळे कामकाज ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देव्यापारी वर्गासह शेतकरी बांधवांची मोठी अडचण

दिंडोरी : बँक खाजगीकरणाच्या विरोधात दोन दिवस पुकारण्यात आलेल्या बंदमुळे दिंडोरी तालुक्यातील बँकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत.

तालुक्यातील प्रमुख बँकां खासगीकरणाच्या विरोधात एकवटल्याने दिंडोरी शहरासह तालुक्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँका या संपात उतरल्याने बँकांचे संपूर्ण कामकाज ठप्प होते. दिंडोरी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया,युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र या प्रमुख बँकांसह काही खासगी बँकांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याने व्यापारी वर्गासह शेतकरी बांधवांची मोठी अडचण झाली.

तालुक्यातील जानोरी, मोहाडी, खेडगाव, वणी, लखमापूर, उमराळे, ननाशी येथील बँकांचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. दिंडोरी तालुक्यात सध्या द्राक्ष हंगाम सुरु असल्याने शेतकरी वर्गाचे नोकरदार वर्गाचे बँक संपामुळे मोठी गैरसोय होत आहे. (१६ दिंडोरी बँक)

Web Title: Bank strike in Dindori taluka halts operations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.