२४ तासांत बँकफोडीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:13 AM2021-01-18T04:13:46+5:302021-01-18T04:13:46+5:30

त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात शनिवारी बँकेच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या शाखेमध्ये सुरक्षेची सर्व साधने उपलब्ध होतीम; मात्र ...

Bank robbery exposed in 24 hours | २४ तासांत बँकफोडीचा पर्दाफाश

२४ तासांत बँकफोडीचा पर्दाफाश

Next

त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात शनिवारी बँकेच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या शाखेमध्ये सुरक्षेची सर्व साधने उपलब्ध होतीम; मात्र चोरट्यांनी फायर अलार्म यंत्रणा, ऑटो डायल यंत्रणा, सीसीटीव्हींचे चित्रीकरण साठवणारे डीव्हीआर यंत्रांसह संगणकांचे ३ सीपीयु युनीट असा सुमारे ६४ हजारांचा ऐवज लुटला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, सहायक निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरविली. पोलिसांनी आपले ‘नेटवर्क’ तपासून एका खबऱ्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन या गुन्ह्यातील संशयित संतोष देवराम बांगारे (१९,रा.वेळुंजे), मोहन बंडु बदादे (२२), संदीप लक्ष्मण बदादे (१९,दोघे रा.पेगलवाडी), विष्णु मुकुंदा वाघ (२१, रा.मोठी पिंप्री) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता संशयितांनी गुन्हा केल्याची कबुली दिली, असे वालावलकर यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या ताब्यातून चोरी केलेला निम्म्याहून अधिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. या संशयितांवर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल आहेत; मात्र अशाप्रकारे जबरी चोरीचा प्रकार यापूर्वी केल्याचे आढळून आले नाही. त्याांची चौकशी सुरू असून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: Bank robbery exposed in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.