शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील खातेदारांना बँक मित्र योजनेमुळे दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:25 IST

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून राज्यासह देशभरात लॉकडाऊन व जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. मात्र या संकट काळातही बॅँक मित्र योजनेमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

जळगाव निंबायती : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून राज्यासह देशभरात लॉकडाऊन व जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. मात्र या संकट काळातही बॅँक मित्र योजनेमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.लॉकडाऊनमध्ये सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून देशातील महिलांच्या जनधन बँक खात्यात दरमहा पाचशे रुपये व उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत तीन मोफत गॅस सिलिंडरचे पैसे ग्राहकांच्या बँक खात्यात जमा झाल्याने पैसे काढण्यासाठी खातेदारांची बँकांसमोर सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून मोठी झुंबड उडत असे. वेळ प्रसंगी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागत असे.शहरातील ही स्थिती नित्याचीच झाली असताना ग्रामीण भागात मात्र मिनी बँक तथा बँक मित्र योजनेमुळे बँक खातेदारांना लॉकडाऊनच्या काळात काहीसा दिलासा मिळाला आहे. गावातील बँक खातेदारांना तालुक्याच्या गावी जाऊन बँकेतून पैसे काढण्यापेक्षा आपल्यागावातच बँक मित्रांच्या साह्याने आधारकार्ड खात्याला जोडून खातेदाराच्या हाताचा ठसा घेऊन बँकेची सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.बँक आॅफ महाराष्ट्र निमगाव शाखेच्या जळगाव निंबायतीयेथील मिनी बँकेमुळे चोंडी, जळगाव, पोमनर वाडी, वानेवाडी, घोडेगाव चौकी आदी परिसरातील नागरिकांना विशेषत: महिला व वृद्धांना लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावातच बँकेची सुविधाउपलब्ध झाल्याने तासन्तास बँकेसमोर रांगेत ताटकळत उभं राहण्याच्या त्रासापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.खातेदारांना एकावेळी जास्तीत जास्त दहा हजार रु पयांपर्यंतची रक्कम खात्यातून काढता येते, तर वीस हजार रु पयांपर्यंतचा भरणा आपल्या खात्यात करता येतो. यावेळी खातेदारांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून त्यांचे हात निर्जंतुकीकरण करूनच बँक मित्र सेवा देत आहेत. बँक आॅफ बडोदा सोनज शाखेच्या कौळाणे (नि.) येथील मिनी बँकेचा लाभ परिसरातील कौळाणे, नगाव, वºहाणे, वºहाणेपाडा,काळेवाडी, पंढळओहोळ आदी गावांना झाला आहे.

बँक आॅफ बडोदाचे संस्थापक महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जन्मभूमीत त्यांच्या सन्मानार्थ मिनी बँक सुरू करण्यात आली. लॉक- डाऊनमध्ये बँक व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाने सॅनिटायझर, मास्क, हॅण्डग्लोज व सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांचे पालन करून सामान्य व गरजू खातेदारांना मिनी बँकेमार्फत सेवा पुरविण्यात आली. लॉकडाऊनच्या संकट समयी खातेदारांना पैसे मिळणेकामी त्यांचा वेळ व त्रास कमी करून सेवा दिल्याचे समाधान आहे.- चंद्रकांत कुलकर्णी, बँक मित्र, कौळाणे (निं)

टॅग्स :bankबँकMONEYपैसा