शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बिवलकर लेनमधील बंदिस्त वाडा कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 01:14 IST

मेनरोड येथील बिवलकर लेनमधील धोकादायक झालेला  एक वाडा संततधारेत सकाळच्या सुमारास अचानक कोसळला. सकाळची वेळ असल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.

नाशिक : मेनरोड येथील बिवलकर लेनमधील धोकादायक झालेला  एक वाडा संततधारेत सकाळच्या सुमारास अचानक कोसळला. सकाळची वेळ असल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. घटनेची माहिती तत्काळ परिसरातील रहिवाशांनी महापालिका अग्निशम दलाला कळविली. काही वेळेत अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी धोकादायक वाड्याची पाडणी करून धोकादायक झालेला भाग उतरवून घेतला.याबाबत महापालिका आपत्ती व्यवस्थापन सूत्रांनी दिलेली माहिती अशी, शहरातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या मेनरोड परिसरात महापालिकेच्या पूर्व विभागाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला एक बंद वाडा पावसाच्या पाण्यामुळे कोसळला. घटनेची माहिती मनपा प्रशासनला तत्काळ कळवूनदेखील उशिराने काही कर्मचारी तेथे दाखल झाले. त्यांनी हा परिसर आमच्या हद्दीत येत नसल्याचे सांगून तेथून काढता पाय घेतल्याचे प्रत्यक्षदर्शी रहिवाशांनीसांगितले.सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत पुन्हा नागरिकांनी माहिती दिली. त्यानंतर हाकेच्या अंतरावर असलेल्या मनपा कार्यालयापासून काही कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी धोकादायक झालेला वाड्याचा अजून काही भाग उतरवून घेतला.पंचवटी, जुने नाशिक या भागात गावठाणचा असल्यामुळे येथे मोठ्या संख्येने जुने वाडे आहेत. बहुतांश वाडे धोकादायक स्थितीत असून, काही वाडे बंद आहेत तर काही वाड्यांमध्ये नागरिक वास्तव्य करून आहे. धोकादायक झालेल्या वाड्यांवर तातडीने उपाययोजना करून कारवाई करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.अनेकदा या भागातील धोकादायक वाड्यांबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार केली आहे, मात्र त्यावर उपाय काढला जात नसल्याने पावसाळ्यात दुर्घटना घडत आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. या बंद वाड्याच्या मालकाचाही थांगपत्ता पालिकेला लागत नाही. पालिका प्रशासन केवळ धोक्याचे फलक झळकावून औपचारिकता पूर्ण करतात, मात्र धोका अद्याप आहे तसाच आहे.- रणजित दुसानीस, रहिवासीया पडीत वाड्याचा त्रास आम्हाला सतत होत आहे. या वाड्याचा सारखा थोडा थोडा भाग पडत असतो त्यामुळे आम्हाला वाड्याजवळून जाताना भीती दाटून येते. महापालिकेने या वाड्यावर तातडीने उपाय काढावा.- इंदूबाई खैरे, रहिवासी

टॅग्स :RainपाऊसAccidentअपघात