नांदूरवैद्य : कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा पाहता यापासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे बाहेरगावाहून येणाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे, तर आलेल्यांची थेट आरोग्य केंद्रावर रवानगी करण्यात येत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात येत असून, नागरिकांनी बाहेर पडू नये, असे वारंवार सांगण्यात येत आहे.जगभरात कोरोनाच्या विषाणूपासून काळजी घेण्यासाठी शासनाकडून विविध ठिकाणी जनजागृती करण्यात येत असून, यासाठी उपाययोजनादेखील करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नांदूरवैद्य येथे गावाच्या प्रवेशद्वारावरच रामकृष्ण दवते या व्यक्तीची यासाठी खास ग्रामपंचायतीच्या वतीने नेमणूक करण्यात आली असून, गावात बाहेरून येणाºया व्यक्तीची कसून तपासणी करूनच प्रवेश दिला जात आहे. सदर व्यक्ती पुणे, मुंबई या ठिकाणाहून आल्याची मिळाल्यास प्रथम नांदूरवैद्य येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्यसेवक घरटे तसेच आरोग्यसेविका मंगला कणसे यांना याबाबत माहिती दिली जाते. त्यानंतर त्या व्यक्तीस पुढील तपासणीसाठी बेलगाव कुºहे येथील आरोग्य केंद्रात पाठवले जाते. तसेच येणाºया व जाणाºया व्यक्तीच्या तोंडाला मास्क नसेल तर ते ध्वनिक्षेपकाद्वारे मास्क लावण्याचे आवाहन करत आहेत. तरी नांदूरवैद्य येथे बाहेरून येणाºया व्यक्तीस पूर्णपणे गावबंदी करण्यात आली असून, कोणीही बाहेरच्या व्यक्तीने गावात प्रवेश करू नये, असे आवाहन नांदूरवैद्य ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.बाहेरून येणाºया व्यक्तीस नांदूरवैद्य येथे प्रवेशद्वारावरच सदर व्यक्तीची काटेकोरपणे विचारपूस सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण दवते करत असून, गळ्यात असणाºया माइकद्वारे ते कोरोनाविषयी जनजागृतीदेखील करत आहेत.
नांदूरवैद्य येथे बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 23:01 IST