शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या निर्यातीवर बंदी हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 05:32 IST

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड येथील शेतकऱ्यांचे रास्ता रोको

चांदवड (जि. नाशिक) : संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाने दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार कांदा निर्यातबंदीने केला आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. कांदा निर्यातबंदीविरोधात चांदवड येथील मुंबई-आग्रा मार्गावरील पेट्रोल पंप चौफुलीवर पवार यांनी शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरत आंदोलन केले. त्यानंतर तिथेच आयोजित सभेत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

आपण दिल्लीत जाऊन मित्रपक्षांना सोबत घेऊन केंद्र सरकारला यावर तोडगा काढण्यास भाग पाडू. या आंदोलनाची दखल केंद्र सरकारला घ्यावीच लागेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात इंडिया आघाडीचे मित्रपक्ष सहभागी होते. 

 इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा रस किंवा साखरेचा सिरप यांचा वापर करण्यावर बंदी लागू केल्यामुळे केंद्र सरकारच्या सहकार खात्याने एन. सी. डी. सी.मार्फत नव्याने सुरू केलेल्या इथेनॉल निर्मितीच्या प्रोत्साहनपर कार्यक्रमाला खीळ बसणार आहे. त्यामुळे ही बंदी मागे घ्यावी, अशी मागणीही पवार यांनी केली.  

केंद्राची खरेदीची तयारी : उपमुख्यमंत्री फडणवीस

नागपूर : कांदा प्रश्नावर राज्य शासनाकडून केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा झाली. निर्यातबंदीचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत जर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अडचणी येत असतील तर केंद्राची कांदा खरेदी करण्याची तयारी आहे.तसा भावदेखील केंद्राकडून जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन गोयल यांनी दिल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम २८३ अन्वये सूचना मांडली. त्याला उत्तर देताना फडणवीस बोलत होते.  

‘कांदाप्रश्नी उपमुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना भेटले आहेत, तर इथेनॉल बाबत मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटलो. या प्रश्नांचा तोडगा केंद्र स्तरावर काढावा लागेल. 

            - अजित पवार, उपमुख्यमंत्रीकेंद्राच्या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कांदा उत्पादकांच्या मागे उभे राहावे. केंद्र सरकार राज्यातील नेत्यांचे ऐकायला तयार नाही. शेतकरी मेला तरी चालेल, यांना काही फरक पडत नाही.   

- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

सोलापुरात विक्रमी १४०० ट्रक कांदा

विठ्ठल खेळगी

सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील विक्रमी १४०० ट्रक कांद्याची आवक झाली. निर्यातबंदीच्या निर्णयामुळे भाव कमी होईल म्हणून शेतकरी धास्तावून गेला आहे. त्यामुळे कच्चा माल बाजारात मोठ्या प्रमाणात आला आहे. त्यामुळे दरात घसरण झाली. मागील आठवड्यात पाच हजारांपर्यंत गेलेला दर सोमवारी ३,५०० रुपयांवर पोहोचला होता. 

चार हजार भाव द्यावा

कांदा उत्पादकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राच्या निर्यातबंदीचा विरोध करावा, अन्यथा राज्य सरकारने चार हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी अधिवेशनात केली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार