‘डी जे’ वाजविण्यांवर प्रतिबंध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 07:05 PM2018-09-11T19:05:25+5:302018-09-11T19:05:33+5:30

त्र्यंबकेश्वर : गणेशोत्सव साजरा करतांना डीजेवर उच्च व सर्वोच्च न्यायालयाने डीजे वाजविणाऱ्यांवर पुर्ण बंदी घालण्यात आली आहे. डीजेची आॅर्डर देणारा मंडळाचा प्रतिनिधी व डीजे मालक यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात येतील. असे सोमवारी (दि.१०) त्र्यंबकेश्वर मधील गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन गोरे व त्र्यंबकेश्वरचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी सांगितले.

Ban on 'D J'! | ‘डी जे’ वाजविण्यांवर प्रतिबंध !

‘डी जे’ वाजविण्यांवर प्रतिबंध !

Next

त्र्यंबकेश्वर : गणेशोत्सव साजरा करतांना डीजेवर उच्च व सर्वोच्च न्यायालयाने डीजे वाजविणाऱ्यांवर पुर्ण बंदी घालण्यात आली आहे. डीजेची आॅर्डर देणारा मंडळाचा प्रतिनिधी व डीजे मालक यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात येतील. असे सोमवारी (दि.१०) त्र्यंबकेश्वर मधील गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन गोरे व त्र्यंबकेश्वरचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी सांगितले. याबरोबरच नियमांचे काटेकोर पालन करुन पोलीसांना सहकार्य करावे. तसेच नॉइज लेव्हल मीटर हे ध्वनी प्रदुषण डेसिबल यंत्र पोलीस स्टेशनला दोन सेट व उप अधिक्षक कार्यालयात एक सेट आणले असुन त्या मशीनवर आवाजाचा डेसिबल मोजता येणार आहे. दरम्यान गणपती विसर्जनाच्या वेळी शेवटच्या गणपतीचे विसर्जन रात्री १२ पुर्वीच व्हावयास हवे. असेही बजाविलेत्यानंतर अजिबात चालणार नसल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना बैठकीत ठणकावून सांगितले.

या बैठकीत नगरसेवक सागर उजे यांनी मागे झालेल्या तहसिलदार कार्यालयातील बैठकीत नगराध्यक्ष पुरुषात्तम लोहगावकर व उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार यांनी केलेल्या घोषणेचा पुनरुच्चार केला. त्यांच्या घोषणेनुसार गणेशोत्सव मंडळाने स्वच्छ त्र्यंबकेश्वर व सुंदर त्र्यंबकेश्वर तसेच प्रदुषण मुक्त त्र्यंबकेश्वर या विषयावर उत्कृष्ट देखावा सादर करणाºया प्रथम, द्वितीय व तृतीय क्र मांक मिळविणाºया मंडळास हजारोंची रोख बक्षीसे नगरपरिषदेतर्फे देण्यात येणार आहे.

Web Title: Ban on 'D J'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस