शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

ममदापुरातून बाळूमामांच्या मेंढ्या तांबेवाडीकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 01:24 IST

ममदापूर : श्री संत सद‌्गुरु बाळूमामा यांची पालखी आणि मेंढ्यांचा कळप ममदापुरातून नांदगाव तालुक्यातील तांबेवाडीकडे रवाना झाला.

ठळक मुद्देह्यचांगभलंह्णचा जयघोष अन् भंडार्‍याच्या उधळणीत पालखी मिरवणूक

ममदापूर : श्री संत सद‌्गुरु बाळूमामा यांची पालखी आणि मेंढ्यांचा कळप ममदापुरातून नांदगाव तालुक्यातील तांबेवाडीकडे रवाना झाला.श्री संत सद‌्गुरू बाळूमामा यांची पालखी व मेंढ्यांचा कळप काही दिवसांपूर्वी ममदापूर येथे दाखल झाला होता. पंचक्रोशीतील भाविकांनी कोविड नियमाचे पालन करीत दर्शनाचा लाभ घेतला.बाळूमामांच्या मेंढ्यांना व पालखीला घराजवळ आसरा दिल्यास शेतात पीक उत्तमरीत्या येते व घरातील आर्थिक स्थिती सुधारून दुष्ट शक्तींचा नाश होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ममदापूर, राजापूरसह परिसरातील अन्नदात्यांकडून दररोज सकाळ व सायंकाळ आरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात येत होता. सद‌्गुरु बाळूमामा यांच्या मेंढ्यांचे एकूण १५ कळप असून, त्यात ३० हजारांहून अधिक मेंढ्या आहेत. बाळूमामांच्या मेंढ्या महाराष्ट्रात विविध दिंड्यांच्या माध्यमातून फिरत असून, प्रत्येक कळपात अंदाजे २ हजार मेंढ्या आहेत. त्याचबरोबर बाळूमामांचा एक घोडादेखील आहे.ममदापूर गावातून बाळूमामा यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. बाळूमामांच्या नावाने चांगभलंच्या नामघोषात भंडारा उधळत निघालेल्या पालखी मिरवणुकीत ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ग्रामस्थ, महिलांनी सडा, रांगोळी करत पालखीचे पूजन केले. गावातील सुवासिनींनी डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. येथील मानपान घेऊन पालखी नांदगावकडे निघाली. ममदापूरकरांनी शिवापर्यंत पालखीला साथ केली. पालखीसह मेंढ्या, घोडा तांबेवाडीच्या दिशेने रवाना झाला. 

टॅग्स :NashikनाशिकTempleमंदिर