जळगाव नेऊर : ह्यशेतकरी खेळत आहेत टोमॅटो लागवडीचा जुगारह्ण या आशयाची बातमी तीन महिन्यांपूर्वी लोकमतमध्ये प्रसिद्ध झाली. नर्सरीमध्ये टोमॅटो रोपांची झालेली बुकिंग बघता याबाबत वार्तांकन केले होते, मोठी मेहनत घेऊन बळीराजा टोमॅटो लागवडीचा जुगार खेळला पण या जुगारात बळीराजाला मात्र अपयश आले असून, आता मिळत असलेल्या टोमॅटो भावातून शेतकऱ्यांचा खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.मागील वर्षाच्या तुलनेत इतर पिकांना फाटा देऊन शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडी केल्या, त्यात लाखो रुपयांचा खर्च करून टोमॅटो पीक उभे केले. पण आज लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा पडत आहे.टोमॅटोने बिघडले शेतकऱ्यांचे आर्थिक गणितशेतकरी कोणतेही पीक घेताना पिकाबरोबर चार पैसे मिळेल त्याची स्वप्नं बघत असतो. पण मागील वर्षी कोरोना संसर्गामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीकडे पाठ फिरवली. यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नर्सरीमध्ये टोमॅटो रोपे बुक करून लागवडी केल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी येतील का, बाजार समित्यात टोमॅटो घेतील का ? मजूर मिळतील का ? हे भविष्य अंधारमय असताना शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड करून जुगार खेळून पाहिला, पण आज टोमॅटोला सरासरी शंभर रुपये कॅरेटचा भाव मिळत असून त्यातून शेतकऱ्याचा खर्चदेखील वसूल होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पुढील आर्थिक गणित बिघडून गेले आहे.मी टोमॅटो रोप बुकिंगसाठी नर्सरीमध्ये गेलो असता टोमॅटो रोपांची प्रचंड बुकिंग बघून व त्याच दिवशी लोकमतमध्ये आलेली ह्यशेतकरी खेळत आहे टोमॅटो लागवडीचा जुगारह्ण ही बातमी वाचली आणि मी टोमॅटो न लावण्याचा निर्णय घेतला.अतिरिक्त उत्पन्नामुळे सध्या टोमॅटोचे दर घसरले आहेत,यासाठी सरकारने पिकांचे योग्य नियोजन,अचूक पीक पाहणी,निर्यात धोरण यावर जोर दिला पाहिजे.त्यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही.- किरण आवारे, शेतकरी.
टोमॅटोच्या जुगारात बळीराजाला अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 22:51 IST
जळगाव नेऊर : ह्यशेतकरी खेळत आहेत टोमॅटो लागवडीचा जुगारह्ण या आशयाची बातमी तीन महिन्यांपूर्वी लोकमतमध्ये प्रसिद्ध झाली. नर्सरीमध्ये टोमॅटो रोपांची झालेली बुकिंग बघता याबाबत वार्तांकन केले होते, मोठी मेहनत घेऊन बळीराजा टोमॅटो लागवडीचा जुगार खेळला पण या जुगारात बळीराजाला मात्र अपयश आले असून, आता मिळत असलेल्या टोमॅटो भावातून शेतकऱ्यांचा खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
टोमॅटोच्या जुगारात बळीराजाला अपयश
ठळक मुद्देलोकमतच्या वृत्तानंतर निर्णय बदलले : शेतकऱ्यांचे बदलले आर्थिक गणित