शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मगर तस्करांचा जामीन अर्ज न्यायालयाकडून रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:14 IST

मगरीच्या आठ पिल्लांची तस्करी करताना रंगेहाथ पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने रद्द केला. तसेच वनविभागाच्या तपासी पथकाला संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले आहे; मात्र त्यानंतर दोघेही संशयित शहरासह जिल्ह्यातून पसार झाल्याने वनविभागाच्या तपासी पथकाची धावपळ उडाली आहे.

नाशिक : मगरीच्या आठ पिल्लांची तस्करी करताना रंगेहाथ पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने रद्द केला. तसेच वनविभागाच्या तपासी पथकाला संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले आहे; मात्र त्यानंतर दोघेही संशयित शहरासह जिल्ह्यातून पसार झाल्याने वनविभागाच्या तपासी पथकाची धावपळ उडाली आहे.  वन्यजीव सप्ताहाच्या पहिल्या दिवशी (दि.१) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने सापळा रचून मगरीच्या आठ पिलांसह दोन कासवांच्या तस्करीचा डाव उधळला होता. पोलिसांनी दोघा संशयितांना रंगेहाथ ताब्यात घेत वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. पुढील तपासासाठी गुन्हे शाखेकडून संशयितांना मुद्देमालासह वनविभाग पश्चिम भागाकडे हस्तांतरित करण्यात आले होते. त्यानंतर दोघा संशयितांना मुद्देमालासह प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात वनविभागाने हजर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयीन कोठडी सुनावली दरम्यान, संशयितांकडून जामीन अर्ज न्यायालयात सादर करण्यात येऊन त्यावर युक्तीवाद झाला त्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. जामीन रद्द करण्यात यावा, यासाठी वनविभाग पश्चिम नाशिक कार्यालयाने सत्र न्यायालयात दाद मागितली. त्यानुसार नुकतीच या खटल्यावर सुनावणी होऊन सत्र न्यायालयाने वनविभागाचे तपासी वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे यांना दोघा संशयितांना अटक करुन न्यायालयापुढे हजर करण्याचे आदेश देत त्यांचा जामीन नामंजूर केला.  या प्रकरणातील संशयित महाविद्यालयीन विद्यार्थी फैज कोकणी व सौरभ रमेश गोलाईत यांचा शोध घेण्यासाठी उपवनसंरक्षक टी.ब्यूला एलील मती यांच्या आदेशान्वये सहायक वनसंरक्षक स्वप्नील घुरे यांनी दोन पथके नियुक्त केली.  यानुसार मागील दोन दिवसांपासून शहर व परिसरात त्यांचा शोध घेतला जात असला तरी ते अद्याप वनविभागाच्या हाती लागू शकलेले नाही. कोकणीपुरा व जेलरोड या भागातील त्यांच्या निवासस्थानीही पथकाकडून झाडाझडती घेत नातेवाइकांकडे चौकशी करण्यात आली; मात्र त्यांचा थांगपत्ता पथकाला लागू शकलेला नाही.कोकणी उच्च न्यायालयातमगरीच्या आठ पिल्लांच्या तस्करी करताना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलेल्या संशयित कोकणी याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात सोमवारी (दि.२८) याप्रकरणी सुनावणी होणार असून, वनविभागाचे तपासी पथकही बाजू मांडण्यासाठी न्यायालयात हजर राहणार आहे.  कोकणीपुरा व जेलरोड या भागातील त्यांच्या निवासस्थानीही पथकाकडून झाडाझडती घेत नातेवाइकांकडे चौकशी करण्यात आली; मात्र त्यांचा थांगपत्ता पथकाला लागू शकलेला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस