शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच तोळे सोने असलेली बॅग प्रवाशाला केली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:42 IST

दिंडोरी तालुक्यातील वणी येथील एक कुटुंब सिडकोला येण्यासाठी निघाले. यावेळी त्यांनी एका रिक्षातून प्रवास केला असता सोबत असलेली बॅग ते कुटुंब अनावधानाने रिक्षामध्ये विसरले;

सिडको : दिंडोरी तालुक्यातील वणी येथील एक कुटुंब सिडकोला येण्यासाठी निघाले. यावेळी त्यांनी एका रिक्षातून प्रवास केला असता सोबत असलेली बॅग ते कुटुंब अनावधानाने रिक्षामध्ये विसरले; मात्र ही बाब रिक्षाचालकाच्या उशिरा लक्षात आल्यानंतर त्याने अंबड पोलीस ठाणे गाठून त्यांच्याकडे बॅग स्वाधीन केली. या बॅगेत महत्त्वाच्या कागदपत्रांसह सुमारे साडेपाच तोळे सोन्याचे दागिने होते.दरम्यान, पोलिसांनी या रिक्षा चालकाचा सत्कार केला़ प्रकाश मुरलीधर सोनार (रा. वणी) हे त्यांच्या पत्नीसह नाशिकला बुधवारी (दि.२७) आले. सोनार कुटुंबीय पवननगरपर्यंत रिक्षामधून (एमएच १५, एफ यू ०३३७)आले. रिक्षातून प्रवासी उतरून गेल्यानंतर रिक्षाचालक वाल्मीक गायकवाड यांच्या लक्षात आले की, प्रवासी त्यांची बॅग रिक्षातच विसरून निघाले आहे. गायकवाड यांनी क्षणाचाही विलंब न करता रिक्षा थेट अंबड पोलीस ठाण्यात धाडली. त्यानंतर पोलिसांनी या बॅगेची तपासणी करीत त्यामध्ये असलेल्या कागदपत्रांवरून सोनार यांचा शोध घेऊन संपर्क साधला व त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. यावेळी रिक्षाचालक गायकवाड यांच्या हस्ते ही बॅग सोनार यांच्या ताब्यात देण्यात आली. रिक्षाचालक गायकवाड यांनी दाखविलेले प्रसंगावधान व प्रामाणिकपणामुळे ‘प्रवासी देवो भव:’ म्हणून त्यांनी आपले कर्तव्य पार पाडल्याची चर्चा सिडको परिसरातून होत होती.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस