शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात खरिपाचे बिघडले गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 00:10 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात कृषी विभागाच्या माहितीनुसार ५१ हजार ७४३ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झालेली आहे पण या वर्षी मात्र दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांचे खरीप पिकाचे गणित बिघडले असून तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात खरिप पिकाची कोळपणी, औषधे फवारणी सुरू आहे तर पश्चिम भागात मात्र कुठे पेरणी झाली आहे तर कुठे पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा आहे त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे वरुणराजाने गणित बिघडले आहे.

ठळक मुद्देकोळपणी, फवारणी, बिजे अंकुरली तर कुठे पेरणी खोळंबली

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात कृषी विभागाच्या माहितीनुसार ५१ हजार ७४३ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झालेली आहे पण या वर्षी मात्र दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांचे खरीप पिकाचे गणित बिघडले असून तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात खरिप पिकाची कोळपणी, औषधे फवारणी सुरू आहे तर पश्चिम भागात मात्र कुठे पेरणी झाली आहे तर कुठे पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा आहे त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे वरुणराजाने गणित बिघडले आहे.पावसावर अवलंबून असलेल्या उत्तर-पूर्व भागात सुरुवातीला झालेल्या पावसावर शेतकर्‍यांनी पेरणी केली पण पंधरा ते वीस दिवस पाऊस उघडल्याने या भागातही कुठे बियाणे उतरले, तर कुठे उतरलेच नाही. पण गेल्या दहा दिवसापूर्वी झालेल्या पावसावर पिकांना जीवदान मिळाले तर कुठे दुबार पेरणी केली, त्यामुळे शेतकऱ्यांची गाडी रुळावर आली असली तरी पश्चिम भागातील साताळी, चिचोंडी बुद्रुक, चिचोंडी खुर्द, भिंगारे, मुखेड परिसर, नेऊरगाव परिसरात अजूनही शेतकरी पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.जसजसे दिवस वाढत चालले आहेत तस तसे शेतकरी पिकांमध्ये बदल करत असून पुढील कांदा पिक शेतकऱ्यांना महत्त्वाचे असल्याने अनेक शेतकरी मका ऐवजी सोयाबीन पिकाकडे वळले आहे, कारण मका पिकाला कालावधी जास्त लागत असल्याने व पेरणी लेट होत असल्यामुळे पुढे उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी सोयाबीन पिकाकडे कल दिसत आहे.पिक कामे खोळंबलीकृषी विभागाने एक फुट ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन करूनही अनेक शेतकऱ्यांनी थोड्याफार झालेल्या पावसावर पेरणी केली. पण काही दिवसांपासुन पाऊस लांबल्याने अनेक ठिकाणी जमिनीतील ओल संपुष्टात आल्याने पिक कामे खोळंबली आहेत.गावागावातील पिकांमध्ये फरकपाऊसही लपंडाव खेळत असल्याने एका गावात बरसतो तर दुसऱ्या गावात वाट बघायला लावतो, अशी परिस्थिती पावसाची झाली असून पिकांमध्ये ही फरक पडला असून एका गावात पिके कोळपणीला आली, तर दुसऱ्या गावात बिजे अंकरली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाने धरसोड केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.मुखेड गटात पावसाची प्रतीक्षायेवला पश्चिम भागातील चिचोंडी बुद्रुक, चिचोंडी खुर्द, साताळी, भिंगारे, मुखेड, नेऊरगाव परिसरात अजूनही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या असून शेतकरी जोरदार पावसाची प्रतीक्षा करत आहे.हवामान अंदाजविश्रांती घेतलेल्या वरुण राजाचे राज्यात ठिकठिकाणी ६ जुलै पासून पावसाला सुरवात होईल व ७ ते ११ तारखेदरम्यान राज्यात सर्व भागात हजेरी लावेल. १२ ते १७ काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी वाहूनी तर कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी तर कुठे रिमझिम पाउस १८ तारखे पर्यंत दररोज भाग बदलत पडणार आहे. या पावसावर सर्व शेतकऱ्यांची राहीलेली पेरणी होइल. दर वर्षी जुलै महिन्यात पाउस कमी असतो पण यावर्षी जास्त पाउस होईल.-पंजाब डख, हवामान अभ्यासक. 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस