नांदूरशिंगोटे : नाशिक व अहमदनगर या दोन जिल्ह्यात मालवाहतुकीसाठी महत्त्वाचा असणारा नांदूरशिंगोटे-लोणी-कोल्हार या महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने लोणी रस्त्यावर पुन्हा एकदा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावर संपूर्णपणे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. काही महिन्यांपूर्वी रस्त्यावरील ज्या खड्ड्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते, ते खड्डे पुन्हा उखडले आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून रस्त्याची परिस्थिती ''जैसे थेह्णच झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.सिन्नर व संगमनेर तालुक्यातील सुमारे १५ गावांना जोडणारा नांदूरशिंगोटे - लोणी रस्ता महत्त्वाचा मार्ग आहे. नांदूरशिंगोटे ते कोल्हार या राज्यमार्गाची व नव्याने प्रस्ताव असलेल्या चौपदरी महामार्गाची अवस्था गेल्या दोन महिन्यात अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यावर पडलेले असंख्य खड्डे व आडवे (खळ्या) पडले असून, वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. अलीकडे झालेल्या पावसाने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले असून, सदरचा रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. सदरचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे हस्तांतरित झाला असल्याचे समजते. नांदूरशिंगोटे बायपासपासून निमोणकडे जाणारा रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच छोट्या-मोठ्या प्रमाणात अपघाताना सामोरे जावे लागत आहे. नाशिक-पुणे महामार्गाला जोडलेला नांदूरशिंगोटे ते लोणी हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.अवजड वाहनांच्या संख्येत वाढराज्यात अनलॉक सुरू झाल्यापासून सर्वच ठिकाणी दळणवळण सुरू झाले आहे. काही महिन्यांपूर्वी रस्ते दुरुस्तीचे काम करण्यात आले. त्यावेळी जागोजागी खड्डे भरताना व्यवस्थित पद्धतीने भरण्यात आलेले नाही, ओबडधोबड कामे, रस्त्याची वरचेवर मलमपट्टी करून थातूरमातूर खड्डे बुजविण्याचा प्रयल केला आहे. ते पुन्हा काही महिन्यांतच उखडण्यास प्रारंभ झाला आहे.
नांदूरशिंगोटे - लोणी रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 00:06 IST
नांदूरशिंगोटे : नाशिक व अहमदनगर या दोन जिल्ह्यात मालवाहतुकीसाठी महत्त्वाचा असणारा नांदूरशिंगोटे-लोणी-कोल्हार या महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ...
नांदूरशिंगोटे - लोणी रस्त्याची दुरवस्था
ठळक मुद्देदुर्लक्ष : महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य ; अवजड वाहनांची मोठी वर्दळ