नाशिक : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड, तज्ज्ञ सदस्य डॉ. एस. बी. निमसे, डॉ.भूषण कर्डिले व डॉ. राजाभाऊ करपे, डी. डी. देशमुख यांच्या उपस्थितीत दि. ३० व ३१ जुलैला शासकीय विश्रामगृह, गोल्फ क्लब येथे जनसुनावणीचे आयोजन करण्यात आलेले आहे. नाशिक येथे लाडवंजारी, कानडे, रामगढीया शिख व वैश्यवाणी तथा वळंजूवाणी, वळांजुवाणी, वळुंज, बळुंज, वांळुंज, कुंकारी, शेटे, दलाल या जाती समूहाची जाहीर जनसुनावणी आयोजित केलेली आहे. या जाती समूहाने केलेल्या मागणी संदर्भात ज्या संस्था, संघटना, व्यक्ती यांना काही निवेदन, हरकती व सूचना मौखिक किंवा लेखी स्वरूपात मांडावयाच्या असल्यास त्यांनी दि. ३० व ३१ जुलै रोजी शासकीय विश्रामगृह (गोल्फ क्लब) नाशिक येथील सभागृहात सकाळी ११.३० ते ५ या वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे यांनी केले आहे.
मागासवर्ग जनसुनावणी ३० पासून नाशकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 01:20 IST