नाशिक : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्टÑाची जनता असून, म्हणूनच त्यांच्या भोवती राज्याचे राजकारण फिरत असल्याने स्वाभिमान संघटना, समर्थ कामगार युनियनचे पदाधिकारी त्यांच्या पाठीशी कायम राहतील, असा दावा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदीप कोतवाल यांनी केला आहे.नारायण राणे यांच्यामुळे सत्ताधारी भाजपा व शिवसेना संभ्रमीत झाली असून, राणे यांनी कोणताही राजकीय निर्णय घेतला तर हजारो समर्थक त्यांच्या पाठीशी राहतील. नाशिक शहर व जिल्ह्यातील राणे समर्थक कुटुंबीय, मराठा संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, राणे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकाºयांमुळे आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलणार आहे, असेही डॉ. कोतवाल यांनी म्हटले आहे.
समर्थक राणेंच्या पाठीशी; स्वाभिमानचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 15:38 IST