शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महासभेत ‘पाकिस्तान’ मुर्दाबाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 01:36 IST

काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सभागृहात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत नगरसेवकांनी परिसर दणाणून सोडला.

नाशिक : काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सभागृहात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत नगरसेवकांनी परिसर दणाणून सोडला. त्यामुळे महासभेचे कामकाज चालविण्याच्या तयारीत असलेल्या सत्ताधारी भाजपाला महासभा तहकूब करावी लागली. दरम्यान, महासभेपूर्वीदेखील पाकिस्तानच्या प्रतीकात्मक ध्वजाची होळी भाजपाच्या काही नगरसेवकांनी केली.महापालिकेची तहकूब झालेली ही महासभा आता शुक्रवारी (दि. २२) होणार आहे. महापालिकेची मासिक महासभा बुधवारी (दि. २२) सकाळी आयोजित करण्यात आली होती. महापालिकेच्या महासभेने सर्वप्रकारची करवाढ रद्द करण्याचा ठराव करूनही आयुक्त त्याची अंमलबजावणी करीत नसल्याने शिवसेनेसह विरोधी पक्षांनी त्यावर लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर घणाघाती चर्चा होण्याची शक्यता होती. मात्र ती चर्चा टळली आहे. महापालिकेची महासभा बुधवारी (दि. २०) महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. मात्र, तत्पूर्वी मुकेश शहाणे यांच्यासह काही नगरसेवकांनी पाकिस्तानचा निषेध करीत सभागृहाबाहेर पाकिस्तानचा प्रतीकात्मक झेंडा जाळला. त्यानंतर सभागृहात कामकाज सुरू झाल्यानंतर हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाचे वाचन करण्यात आले आणि त्यानंतर महापौरांनी नियमित कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अपक्ष नगरसेवक मुशीर सय्यद यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. त्यांना शिवसेनेसह अन्य विरोधी पक्षांनी साथ दिली. भाजपाचे नगरसेवक यात सहभागी झाले होते. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी यावेळी दहशतवादी हल्ल्यात ४४ जवानांचे प्राण गेले. देशपातळीवर शोक व्यक्त केला जात असताना महासभा घेणे संयुक्तीत होणार नाही, असे सांगत सभा तहकुबीची मागणी केली. मुशीर सय्यद यांनीदेखील ही सभा तहकूब करावी, असे सांगितले.लक्षवेधीबाबत चर्चाच नाही...महापालिकेची महासभा घोषणाबाजीनंतर तहकूब करण्यात आली असली तरी ती सुरू असताना विरोधकांनी लक्षवेधी दाखल करून घ्या, अशी सूचनाही न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महासभेत जवानांच्या हौतात्म्याबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर त्यातदेखील सभा तहकुबीची सूचना नव्हती, असे भाजपा गटनेता संभाजी मोरूस्कर यांनी सांगितले.विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी यावेळी दहशतवादी हल्ल्यात ४४ जवानांचे प्राण गेले. देशपातळीवर शोक व्यक्त केला जात असताना महासभा घेणे संयुक्तीत होणार नाही, असे सांगत सभा तहकुबीची मागणी केली.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका