शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनानंतर उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 01:19 IST

दि कळवण मर्चंट को-आॅप. बॅँकेत केलेले सभासद, नूतनीकरण व पोटनिवडणूक यासह विविध मागण्यांबाबत चौकशी करण्याचे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गौतम बेलसाणे यांच्या आश्वासनानंतर व सहकार विभागाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर कमकोचे माजी संचालक कैलास जाधव यांनी कमको बॅँकेसमोरील उपोषण मागे घेतले.

कळवण : दि कळवण मर्चंट को-आॅप. बॅँकेत केलेले सभासद, नूतनीकरण व पोटनिवडणूक यासह विविध मागण्यांबाबत चौकशी करण्याचे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गौतम बेलसाणे यांच्या आश्वासनानंतर व सहकार विभागाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर कमकोचे माजी संचालक कैलास जाधव यांनी कमको बॅँकेसमोरील उपोषण मागे घेतले. दरम्यान, १५ दिवसांत चौकशी होऊन न्याय न मिळाल्यास पुनश्च उपोषणाचा इशारा जाधव यांनी उपोषण सांगताप्रसंगी सहकार विभागाला दिला.  कमकोतील सत्ताधाऱ्यांसह विरोधी गटाच्या कमकोच्या विद्यमान व माजी पदाधिकारी, संचालक व सर्वपक्षीय पदाधिकारी व सभासदांनी उपोषणकर्ते जाधव यांची दिवसभरात भेट घेतली व चर्चेतून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला. कमको बॅँक पदाधिकारी व संचालकांनी उपोषणकर्ते जाधव यांची उपोषणस्थळी भेट घेऊन मागण्यांबाबत लेखी आश्वासन देऊन चर्चेची तयारी दर्शविली.  जाधव यांच्या मागण्यांबाबत बॅँकेने सकारात्मक प्रतिसाद देऊन शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न केला; परंतु सहकार विभागाच्या लेखी आश्वासनावर जाधव ठाम राहिल्याने सहायक निबंधक प्रकाश देवरे यांच्या लेखी आश्वासनानंतर जिल्हा उपनिबंधक यांचे प्रतिनिधी एस. ए. देवघरे व नायब तहसीलदार आर. एम. गांगुर्डे यांनी लिंबू सरबत देऊन उपोषण मागे घेण्यात आले.  यावेळी पोलीस निरीक्षक मांडवळकर, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, कमकोचे माजी अध्यक्ष सुनील शिरोडे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रकाश आहेर व  जितेंद्र वाघ, कमकोचे अध्यक्ष प्रवीण संचेती, भाजपा शहराध्यक्ष निंबा पगार, दिलीप पगार, डॉ. अनिल महाजन, अनिल मालपुरे, बंडू पगार, नरेंद्र वालखडे, दीपक अमृतकार, धीरज कोठावदे यांच्यासह कैलास जाधव समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हा उपनिबंधक करणार चौकशीदि कळवण मर्चंट को-आॅप. बॅँकेच्या संचालक मंडळाने सन २०१५-२०१६ मध्ये कार्यक्षेत्राबाहेरील सभासद करून कर्जपुरवठा केला असल्याने त्यांचे सभासदत्व रद्द करावे, कमकोच्या पाच संचालकांनी सन २०१७ मध्ये राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक घ्यावी व त्यानंतर बॅँकेचा नूतनीकरण सोहळा घ्यावा, संचालक मंडळाच्या नातेवाइकांना कर्जवाटप करण्यात आले आहे, त्यांची लेखापरीक्षणाची नियुक्ती करून चौकशी करावी. कमको बॅँकेच्या नूतनीकरण कामाची चौकशी करावी आदी पाच मागण्यांच्या चौकशीबाबत जिल्हा उपनिबंधक गौतम बेलसाणे यांनी १५ दिवसांत चौकशी करण्याचे आदेश दिले असून चौकशी अधिकारी यांची नेमणूक केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक