शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

हरभयाचा दाणा घशात अडकल्याने बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 02:20 IST

घरात खेळताना तोंडात टाकलेला हरभºयाचा दाणा घशात अडकल्याने एक वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि़१६) सकाळी सिडकोतील हनुमान चौकात घडली. सुजय जयेश बिजुटकर (१) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे़ सहा महिन्यांपूर्वी याच परिसरातील वीर जयस्वाल या चिमुकल्याच्या घशात खेळण्याचा फुगा अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

सिडको : घरात खेळताना तोंडात टाकलेला हरभºयाचा दाणा घशात अडकल्याने एक वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि़१६) सकाळी सिडकोतील हनुमान चौकात घडली. सुजय जयेश बिजुटकर (१) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे़ सहा महिन्यांपूर्वी याच परिसरातील वीर जयस्वाल या चिमुकल्याच्या घशात खेळण्याचा फुगा अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई येथील रहिवासी सुजया बिजुटकर या आपला एक वर्षीय मुलगा सुजयसह आईसोबत राहतात़ शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास सुजय हा घरात खेळत असताना त्याने हरभºयाचा दाणा तोंडात टाकला़ यामुळे त्यास अस्वस्थ वाटू लागल्याने त्यास तत्काळ जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले़ या ठिकाणी उपचार केल्यानंतर त्यास घरी पाठविण्यात आले होते़ सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सुजया या कामावर जाण्यासाठी निघाल्या असता मुलगा सुजय यास उठविण्यासाठी गेल्यावर त्याची हालचाल दिसून न आल्याने त्यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले़  दरम्यान, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच बुधवारी (दि़१४) बिजुटकर कुटुंबीयांनी सुजयचा वाढदिवस साजरा केला होता़ या वाढदिवसाच्या आनंदाचे क्षण डोळ्यासमोर असतानाच अचानक ही घटना घडल्याने कुटुंबीयांच्या दु:खाला पारावार राहिला नाही़ दरम्यान, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़  वर्षभरातील तिसरी दुर्दैवी घटना़़़सिडकोतील हनुमान चौकातील वीर विनोद जयस्वाल या आठ महिन्यांच्या मुलाच्या घशात फुगा अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सहा महिन्यांपूर्वी घडली होती़, तर ५ फेब्रुवारी रोजी नाशिकरोडजवळील चांदगिरी येथील चार वर्षीय शालिनी दत्तात्रय हांडगे या चिमुकलीचा दहा रुपयांचे नाणे गिळल्याने मृत्यू झाला़ या घटनेस बारा दिवसांचा कालावधी होत नाही तोच हरभºयाचा दाणा अन्ननलिकेत अडकल्याने सुजय बिजुटकर या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी, पैसे वा फुगे देताना पालकांनी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे़

टॅग्स :Deathमृत्यू