नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने कथालेखनासाठी दिला जाणारा बाबूराव बागुल पुरस्कार लातूर जिल्ह्यातील केकत सिंदगी येथील अंकुश सिंदगीकर यांच्या ‘गंधरव’ या कथासंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे.रोख २१ हजार रुपये, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नवोदित कथालेखकांच्या प्रथम प्रकाशित कथासंग्रहास बाबूराव बागुल पुरस्कार देण्यात येतो. सिंदगीकर हे क्रांती माध्यमिक विद्यालयात शिक्षक असून, त्यांनी आजवर विपुल लेखन केले आहे. बाबूराव बागुल पुरस्कारासाठी एकूण १६ प्रस्ताव आले होते. त्यातून समितीने ‘गंधरव’ कथासंग्रहाची निवड केली. लवकरच सिंदगीकर यांना समारंभपूर्वक पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याचे विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख श्याम पाडेकर यांनी कळविले आहे.
सिंदीकर यांना बाबूराव बागुल पुरस्कार
By admin | Updated: July 25, 2014 00:39 IST