शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

 बिबट्याची दहशत वासरू, कुत्र्याचा फडशा : पिंजरा लावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 20:02 IST

दोन दिवसांपुर्वी प्रशांत पाटील यांच्या शेतातील गोठ्यात मध्यरात्री शिरलेल्या बिबट्याने एका वासरूचे तसेच पाटील यांच्या बंगल्याच्या बाहेर बांधून ठेवलेल्या पाळीव कुत्र्याचा

ठळक मुद्देवडनेर दुमाला हा परिसर लष्कराच्या हद्दीला लागूनशेतकरी दिवसाही एकटे दुकटे फिरण्यास घाबरत आहेत.

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : वडनेर दुमाल्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम असून, दोन दिवसांपुर्वी प्रशांत पाटील यांच्या शेतातील गोठ्यात मध्यरात्री शिरलेल्या बिबट्याने एका वासरूचे तसेच पाटील यांच्या बंगल्याच्या बाहेर बांधून ठेवलेल्या पाळीव कुत्र्याचा फडशा पाडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या वाढत्या उपद्रवाची वन खात्यानेही दखल घेवून तातडीने पिंजरा लावला असला तरी, बिबट्या हुलकावणी देण्यात यशस्वी झाला आहे.

वडनेर दुमाला हा परिसर लष्कराच्या हद्दीला लागून असून, शिवाय परिसरात शेतजमीन व जंगलही मोठ्या प्रमाणात आहे. गावाबरोबरच अनेक शेतकरी शेतातच घरे बांधून राहात आहेत. असे एकटे दुकटे घर, गोठे बिबट्याचे लक्ष्य ठरू लागले आहे. त्यातूनच दोन दिवसांपुर्वी प्रशांत पाटील यांच्या मळ्यातील गोठ्यात रात्री अडीच वाजेच्या सुमारास बिबट्याने प्रवेश करून छोटे वासरू ओढून नेले. बिबट्याच्या शिरकावाची भणक पाटील यांच्या पाळीव कुत्र्याला लागली असता, बिबट्याने बांधून ठेवलेल्या पाळीव कुत्र्यावरही हल्ला चढवून त्याला ठार मारले आहे. दुस-या दिवशी सकाळी ही घटना उडकीस येताच, पाटील यांच्या मळ्यात शेतकऱ्यांनी गर्दी केली. त्याच बरोबर त्यांच्या आजुबाजुच्या शेतक-यांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. या घटनेची खबर वन खात्यास देण्यात आली असता, त्यांनी पोपट दत्तु पाटोळे यांच्या शेतात पिंजरा लावला असून, त्यात कुत्रे बांधून ठेवण्यात आले आहे. मात्र बिबट्याने पिंज-याकडे पाठ फिरविली आहे. वडनेर दुमाला परिसरात अधून मधून बिबट्याचे खुले आम दर्शन होत असून, त्यामुळे शेतकरी दिवसाही एकटे दुकटे फिरण्यास घाबरत आहेत.

 

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक