नाशिक : नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बॅँकेच्या अध्यक्षपदी उत्तमराव देशमाने व उपाध्यक्षपदी बबनराव भोसले यांची बिनविरोध निवड झाली. प्राधिकृत अधिकारी तथा सहायक निबंधक मनीषा खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. बॅँकेच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. बॅँकेच्या अध्यक्षपदासाठी उत्तमराव देशमाने यांच्या नावाची सूचना अशोक गुळेचा यांनी मांडली. त्यास रमण मोरे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी बबनराव भोेसले यांच्या नावाची सूचना दिलीप सानप यांनी मांडली. सौ. प्रतिभा गोवर्धने यांनी त्यास अनुमोदन दिले. या नूतन अध्यक्षांचा सत्कार बॅँकेचे ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब खताळे यांनी, तर नूतन उपाध्यक्ष बबनराव भोसले यांचा सत्कार महेंद्र बाऱ्हे यांनी केला. यावेळी बॅँकेचे मावळते अध्यक्ष सुनील बच्छाव, उपाध्यक्ष प्रमोद निरगुडे, संचालक महेश आव्हाड, सुधीर पगार, विजयकुमार हळदे, दिलीप मोरे, उत्तमबाबा गांगुर्डे, नीलेश देशमुख, बाळासाहेब ठाकरे-पाटील, शिरीष भालेराव, राजेंद्र पवार, हरिश्चंद्र रणमाळे, सौ. शुभदा देशपांडे यांच्यासह सभासद व अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद कर्मचारी बॅँकेच्या अध्यक्षपदी उत्तमराव देशमाने उपाध्यक्षपदी बबनराव भोेसले
By admin | Updated: November 14, 2014 01:16 IST