शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

बाबा शेख खूनप्रकरणी संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 01:01 IST

सिन्नरफाटा येथील सराईत गुन्हेगार बाबा शेख याच्या खुनप्रकरणी फरारी असलेला मुख्य संशयित तौफिक उर्फ टिपू शेख याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले.

नाशिकरोड : सिन्नरफाटा येथील सराईत गुन्हेगार बाबा शेख याच्या खुनप्रकरणी फरारी असलेला मुख्य संशयित तौफिक उर्फ टिपू शेख याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले.सिन्नरफाटा येथील सराईत गुन्हेगार नवाज उर्फ बाबा बब्बू शेख याचा गेल्या २० सप्टेंबरला रात्री डीजीपीनगर येथील साई मंदिराजवळ गोळी झाडून खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी संशयित समीर खान उर्फ मुर्गी राजा व अर्जुन पीवाल यांना अटक केली होती. मात्र, खुनानंतर मुख्य संशयित तौफिक उर्फ टिप्पू मन्सूर शेख (रा. भीमनगर, जेलरोड) हा फरार होता. गेल्या २५ दिवसांपासून पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना शेख श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेचे रघुनाथ शेगर, रवींद्र बागुल, विशाल काटे, दिलीप मोंढे, महेश साळुंके, देवरे यांनी गुरुवारी रात्री हरेगावला जाऊन घरात लपून बसलेल्या टिपू शेखला शिताफीने ताब्यात घेतले.लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूकनाशिक : महिलेला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या तीन वर्षांपासून तिच्याशी वारंवार संबंध प्रस्थापित करून  नंतर दुसऱ्याच मुलीबरोबर विवाह केल्याप्रकरणी पंचवटीतील हिरावाडी येथील  संशयित तरुणास पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार २०१७ ते २०२० या कालावधीस संशयित प्रदीप जाधव याने संबंधित महिलेला अनेकदा लग्नाचे खोटे आमिष दाखवून शरीरीसंबध प्रस्थापित केले. शिवाय तिच्या संमतीशिवाय गर्भपात केल्याचेही पीडितीने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतरही नेहमीच लग्नाचे आमिष दाखविले, मात्र संशयिताने दुसऱ्या एका मुलीबरोबरच विवाह केल्याने आपली फसवणूक झाल्याची फिर्याद पीडितीने पंचवटी पोलिसांत दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनुसूचित जाती, जमाती अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरवाजा तोडून कपाटातील ऐवज लंपास

नाशिक : घराला कुलूप लावून कुटूंबिया बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून कपाटातील दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे ५५ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद अशोक भानजी गोहिल (रा. गोविंद अपार्टमेंट, आरटीओ ऑफिसजवळ) यांनी पोलिसांत दाखल केली आहे. गेल्या ७ ते १४ तारखेच्या दरम्यान चोरट्यांनी बंद घराचा लोखंडी दरवाजा जोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, तसेच पंधरा हजार रुपये रोख असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी