नाशिक रोड : गोरेवाडी नाशिककर मळा येथे सामायिक विहिरीचे पाणी बघण्याकरिता गेले असता, मागील जमिनीच्या भांडणावरुन वाद घालून वडील व मुलाला मारहाण करून जखमी करण्यात आले.
नाशिककर मळा येथील सोमनाथ चिमणराव जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास त्यांची पत्नी अनिता ही सामायिक विहिरीचे पाणी बघण्यासाठी गेली होती. त्यावेळी मागील जमिनीवरून भांडणाचा राग मनात धरून संशयित प्रमोद निवृत्ती जाधव, राहुल निवृत्ती जाधव, शुभम सखाराम जाधव (रा. नाशिककर मळा) यांनी अनिता यांना शिवीगाळ केली. त्यांचा मुलगा शिवराज जाधव हा आला असता, त्याच्या पोटरीवर व डोक्यात लोखंडी सळईने मारून जखमी केले. वडील सोमनाथ जाधव यांना संशयितांनी पकडून डोक्यात कोयत्याने वार करून जखमी केले. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.