शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
3
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
4
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
5
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
6
गणेश चतुर्थीला मित्रांना, नातेवाईकांना सोशल मीडियावर 'हा' संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
7
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
8
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
9
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
10
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
11
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
12
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
13
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
14
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
15
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
16
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
17
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
18
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
19
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
20
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल

अझ्झुरी आणि आॅरेंज आर्मीची लढाई पेटणार

By admin | Updated: July 9, 2014 01:43 IST

अझ्झुरी आणि आॅरेंज आर्मीची लढाई पेटणार

आनंद खरे

 

विसाव्या विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच दोन उपांत्य सामन्यांमध्ये दोन दक्षिण अमेरिकन आणि दोन युरोपचे संघ अंतिम फेरी गाठण्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. फुटबॉलच्या चारही महाशक्तींमध्ये रंगणाऱ्या या दोन सामन्यांमधून दोन्हीही अमेरिकनांची सरशी होते की, दोन्ही युरोपचे संघ फायनलमध्ये दाखल होतात, की एक अमेरिकन आणि एक युरोपचा संघ अंतिम सामना खेळेल अशा तीनच शक्यता शिल्लक आहेत. ब्राझील-जर्मनीतील पहिल्या उपांत्य सामन्यानंतर आज मध्यरात्री अर्जेंटिना आणि नेदरलॅण्ड या दोन महाशक्तींमध्ये दुसरा उपांत्य सामना रंगणार आहे. अर्जेंटिनाने दोन वेळा हा विश्वचषक उंचावला आहे, तर तीन वेळा अंतिम फेरीत दाखल होऊनही नेदरलॅण्डच्या आॅरेंज आर्मीला या विश्वचषकाला गवसणी घालता आलेली नाही. या दोन संघांमध्ये याआधी ४ वेळा झालेल्या सामन्यांमध्ये नेदरलॅण्डने ४ वेळा तर अर्जेंटिनाला १ वेळेस विजय मिळालेला आहे. १९९४च्या विश्वचषकामध्ये नेदरलॅण्डने दुसऱ्या साखळी राउण्डमध्ये अर्जेंटिनाला ४-० असे पराभूत करून अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम सामन्यात त्याला जर्मनीकडून पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतरच्या अर्जेंटिनामध्येच झालेल्या १९९८च्या ११व्या विश्वचषकामध्ये या दोन संघांमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात निर्धारित ९० मिनिटांमध्ये १-१ अशी बरोबरी झाल्यानंतर अतिरिक्त वेळेत सामना ३-१ असा जिंकत अर्जेंटिनाने पहिले विश्वविजेतेपद मिळवले. नेदरलॅण्डला या सलग दोन विश्वचषकांमध्ये अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. सन १९९८पासूनच्या १६व्या विश्वचषकामध्ये फिफाने प्रथमच २४ ऐवजी ३२ संघांचा समावेश केला. या विश्वचषकामध्ये नेदरलॅण्डने उपांत्य फेरी गाठली. मात्र अंतिम सामन्यात त्याला जर्मनीकडून पराभव पत्कारावा लागला होता. २००६च्या १८व्या विश्वचषकामध्ये नेदरलॅण्डला उपउपांत्यपूर्व फेरीतच पोर्तुगालकडून १-० अशी हार पत्करावी लागली होती. गेल्या २०१०च्या १९व्या विश्वचषकामध्ये मात्र नेदरलॅण्डने बाद फेरीत स्लोव्हाकियाला २-१ असे पराभूत केले, त्यानंतर उपउपांत्य फेरीत ब्राझीललाही २-१ असे पराभूत केले आणि उपांत्य फेरीत उरुग्वेला ३-२ असे पराभूत करून अंतिम फेरी गाठली. मात्र या तिसऱ्यावेळीही अंतिम फेरीत नेदरलॅण्डला स्पेनकडून १-० पराभव पत्करावा लागला. अर्जेंटिना २४ वर्षांनी उपांत्य फेरीत : अर्जेंटिनाने १५ वेळा विश्वचषकामध्ये खेळतांना दोन वेळा (सन १९७८ व १९८६) विश्वविजेतेपद पटकावले आहे. १९८६चे विश्वविजेतेपद मिळविताना डिएगो मॅराडोना याच्या जादुई खेळाने अवघ्या विश्वावरच मोहिनी घातली आणि त्यानंतर प्रत्येक विश्वचषकामध्ये अर्जेंटिनाकडे त्याच दृष्टिकोनातून बघितले जाऊ लागले. त्यानंतरच्या १९९०च्या विश्वचषका मध्ये पुन्हा मॅराडोनाने आपल्या जादुई खेळाच्या आधारे अर्जेंटिनाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचविले. मात्र अंतिम फेरीत जर्मनीकडून पराभूत व्हावे लागले होते. यानंतर अर्जेंटिनाला फारशी चांगली कामगिरी नोंदवता आली नाही. गेल्या २०१०च्या विश्वचषकामध्ये अर्जेंटिनाने याच जादूगाराकडे म्हणजेच डिएगो मॅराडोनाकडे अर्जेंटिनाच्या संघाची सूत्रे सोपविली होती. त्यावेळी आता पुन्हा अर्जेंटिनाच विश्वचषकाकडे यशस्वी वाटचाल करेल, असा आशावाद निर्माण झाला होता. मात्र उपउपांत्य फेरीत अर्जेंटिनाला जर्मनीकडून पराभूत व्हावे लागले होते. त्याच विश्वचषकामध्ये लिओनेल मेस्सीकडे मॅरोडोनोचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते. मात्र त्याला गेल्या विश्वचषकामध्ये एकही गोल करता आला नव्हता. मात्र चार वर्षांनंतर आत्ता मेस्सी निश्चितच चांगलाच परिपक्व झालेला आहे. आणि आता तो नक्कीच मॅराडोनाची गादी चालविण्यासाठी सिद्ध झालेला आहे. त्याप्रमाणे त्याचा या विश्वचषकातील प्रवासही सुरू आहे.विश्वचषकातील दोघांचीही कामगिरी सारखीच या विश्वचषकामध्ये दोन्हीही संघांची कामगिरी सारखीच राहिलेली आहे. गटवार साखळीमध्ये या दोन्हीही संघांनी आपआपले तीनही सामने जिंकून ९ गुणांसह बाद फेरीत प्रवेश केला आहे, तर बाद फेरीच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात दोन्हीही संघांना सोपी वाटणाऱ्या या लढतीत संघर्ष करावा लागला आहे. अर्जेंटिनाला बाद फेरीचा पहिला अडथळा दूर करताना स्वित्झर्लंडने चांगले झुंजवले. ९० मिनिटांच्या खेळातील ०-० अशा बरोबरीनंतर अतिरिक्त १५-१५ मिनिटांमध्येही अगदी शेवटच्या दोन मिनिटात अर्जेंटिनाला अ‍ॅजेल डी मारियाच्या गोलमुळे विजय मिळविता आला आहे. तर त्यानंतरच्या उपउपांत्य सामन्यात बेल्जियमनेही अर्जेंटिनाला चांगली लढत दिली. सामन्याच्या सुरुवातीलाच गोल मिळाल्यामुळे अर्जेंटिनाला हा सामना जिंकता आलेला आहे.नेदरलॅण्डला दोन अमेरिकनांचा अडथळा नेदरलॅण्डनेही साखळी सामन्यामध्ये पहिल्याच सामन्यात गेल्या वेळच्या विश्वविजेत्या स्पेनला चक्क ५-१ असे पराभूत केले. तसेच चिली आणि आॅस्ट्रेलियालाही पराभूत करून तीन सामन्यात १० गोल करत बाद फेरी गाठली. बाद फेरीच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात अमेरिका खंडाच्या मेक्सिकोने नेदरलॅण्डवर १ गोलची आघाडी घेतली आणि ती टिकवूनही ठेवली. आणि आता मेक्सिकोच बाजी मारेल असे वाटत असतानाच त्यांचा झोपलेला सिंह म्हणजेच वेल्ल्सी स्नायडर जागा झाला आणि त्याच्या अप्रतिम किकने नेदरलॅण्डने बरोबरी साधली आणि नंतर लगेचच आक्रमणामध्ये अर्जेन रॉबेनने पेनल्टी मिळविली. त्यांचा बदली खेळाडू हंटलरने गोल करत नेदरलॅण्डला विजयी केले. या सामन्यानंतर उपउपांत्य सामन्यातही नेदरलॅण्डला यापेक्षाही जास्त संघर्ष करावा लागला. ही लढतही सोपी वाटत असताना कोस्टारिका या आखणी एक अमेरिकन संघाने त्यांचे तोंडचे पाणीच पळविले. निर्धारित ९० मिनिटे आणि नंतरची अतिरिक्त १५-१५ मिनिटे वारंवार हल्ले करूनही नेदरलॅण्डला एकही गोल करता आला नाही. आणि शेवटी पेनल्टीवर गेलेल्या या सामन्यामध्ये त्यांच्या रॉबीन व्हॉन पर्सी, अर्जेन रोबेन, वेल्ल्सी स्नायडर आणि केयुट यांनी गोल केले तर बदली गोलरक्षक टीम क्रुर्ल याने दोन पेनल्टी अडवून नेदरलॅण्डला विजयाचा मार्ग मोकळा करून दिला.लढत संघर्षपूर्ण होणार या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या सामन्याचा विचार करता अर्जेंटिनाचा लिओनल मेस्सी चांगलाच फॉर्ममध्ये आहे. मात्र बाद फेरीच्या दोन्हीही सामन्यास त्याला अनुक्रमे स्वित्झर्लन्ड आणि बेल्जियमच्या बचावपटू आणि गोलरक्षकांनी दाद दिलेली नाही. त्यामुळे त्यानेही हे लक्षात घेऊन हुशारीने चेंडू थेट स्वत: गोलमध्ये न मारता आपल्या सहकाऱ्यांना चांगल्या प्रकारे पास करत आपल्या संघाला विजयी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. परंतु त्याचा आघाडीचा सहकारी अ‍ॅजेल डी मारिया मागील सामन्यामध्ये दुखापतग्रस्त झाल्यामुळे खेळू शकणार नाही, तरीही गेल्या सामन्यामध्ये गोल करणारा गोन्झालो हुगायून गोल आपल्या नावावर लागल्यामुळे चांगलाच भरात आलेला आहे, ही अर्जेंटिनासाठी जमेची बाजू आहे. मात्र नेदरलॅण्डचा अटॅक बघता अर्जेंटिनाच्या बचावाची जास्त कसोटी लागणार आहे. नेदरलॅण्डकडे रॉबीन व्हॉन पर्सी, अर्जेन रॉबेन आणि वेल्ल्सी स्नायडर हे जगातील तीन नावाजलेले खेळाडू आहेत. रॉबीन व्हॉन पर्सीला गेल्या दोन सामन्यामध्ये सूर गवसलेला नाही. मात्र महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्याचेकडून अपेक्षा आहेत, तर अर्जेन रॉबेनची गती आणि चकवा देण्याची कला यालाही अर्जेंटिनाच्या बचावपटूंची डोकेदुखी ठरू शकते. वेल्ल्सी स्नायडरही गेल्या दोन सामन्यापासून भरात आलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे नेदरलॅण्डचे प्रशिक्षक लुईस व्हॅन गाल यांची मागील दोन्हीही सामन्यामध्ये रणनीती यशस्वी ठरलेली आहे, तर अर्जेंटिनाचे प्रशिक्षक अलेक्झाड्रो सेबेला हेदेखील अगदी निष्णात आहेत. त्यामुळे खेळाडूबरोबरच या प्रशिक्षकांच्या रणनीतीवरही या सामन्याचे भवितव्य असणार आहे. म्हणूनच मेस्सीचा अर्जेंटिना २४ वर्षांनंतर मिळालेली ही संधी कारणी लावतो की आॅरेंज अर्मी पुन्हा चवथ्या वेळी अंतिम फेरी गाठण्याची किमया करतो, यासाठीचा संघर्ष या स्पर्धेतील वेगळीच उंची गाठेल यात शंकाच नाही.