नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी अधिकाधिक मतदान करावे यासाठी शक्ती विकास अकॅडमीच्या वतीने शहरात विविध ठिकाणी मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅक, त्रिमूर्ती चौक, दूधबाजार आणि कामटवाडे अशा विविध भागांत गर्दीच्या वेळी मतदानाचे आवाहन करणारे कार्यक्रम सादर करण्यात आले. काही ठिकाणी पोस्टर बॅनर्सही लावण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष मनोहर जगताप, नेहरू युवा प्रतिनिधी मनीषा जगताप, सतीश काळे, अशोक जगताप, दीपक जगदाळे, सुरेखा गायकर, राकेश खरे, अमर यादव या अभियानात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)