शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

‘अंनिस’कार्यकर्त्याच्या जागरूकतेने ‘भाग्यरत्न’विक्रीची भोंदूगिरी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 19:53 IST

महाराष्ट्र ‘अंनिस’चे राज्य सरचिटणीस डॉ.ठकसेन गोराणे हे रविवारी (दि.२) सकाळी त्यांचे मूळ गाव दोडी येथे पोहोचले. गावातील बसस्थानक परिसरात एक तरु ण त्यांना छत्री टाकून भाग्यरत्न,दैवी खड्यांच्या अंगठ्याबाबत ध्वनिक्षेपकातून माहिती देताना आढळून आला.

ठळक मुद्देअंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या जाळ्यात अलगद अडकलाग्राहकांना विक्री केलेल्या अंगठ्या पुन्हा घेत त्यांचे पैसे परत केले

नाशिक : अंतर्गोल भिंगातून तळहातावरील रेषा पाहाण्याचा बहाणा करत कोणते भाग्यरत्न कसे फायदेशीर ठरेल हे खात्रीपुर्वक सांगून, फळ ज्योतिषावर विश्वास असणाऱ्या भोळ्याभाबड्यांकडून दहा रूपयांपासून पाचशे रूपयांपर्यंत ‘भाग्यरत्न’च्या अंगठ्या विक्री करणारा अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या जाळ्यात अलगद अडकला. कार्यकर्त्याने जाब विचारत कानउघडणी केली असता त्या विक्रेत्याने सिन्नर तालुक्यातील दोडी गावाच्या बसस्थानकाजवळून आपला गाशा गुंडाळला.महाराष्ट्र ‘अंनिस’चे राज्य सरचिटणीस डॉ.ठकसेन गोराणे हे रविवारी (दि.२) सकाळी त्यांचे मूळ गाव दोडी येथे पोहोचले. गावातील बसस्थानक परिसरात एक तरु ण त्यांना छत्री टाकून भाग्यरत्न,दैवी खड्यांच्या अंगठ्याबाबत ध्वनिक्षेपकातून माहिती देताना आढळून आला. यावेळी त्याच्या ठिय्यावर दहा ते पंधरा गावकरी आपला तळहात दाखवून नशीब आजमावत होते. यावेळी त्यांनी कानोसा घेतला असता तो तरूणव्रिकेता स्वत:च नागरिकांची राशी ठरवित असल्याचे लक्षात आले. कोणते भाग्यरत्न त्या व्यक्तीला लाभदायक आहे, हे पटवून सांगत माथी मारण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. या सगळ्या प्रकाराचे निरिक्षकण करत गोराणे यांनी त्या विक्रेत्याला काही प्रश्न विचारले. ‘तुझे भाग्य फुलविणारे भाग्यरत्नाची अंगठी तू स्वत: घाल आणि भाग्य उजळवून घे, या गोरगरीब भोळ्याभाबड्या गावकऱ्यांना का फसवितो’ असा जाब विचारताच त्याने काही ग्राहकांना विक्री केलेल्या अंगठ्या पुन्हा घेत त्यांचे पैसे परत केले आणि आपला गाशा गुंडाळला. यावेळी कोणीतही तक्रारदार पुढे न आल्याने त्याच्याविरूध्द कायदेशीर कारवाई यावेळी करता आली नाही, असे गोराणे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Andhashraddha Nirmulan Samitiमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरNashikनाशिक