शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
2
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
3
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
4
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
5
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
6
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
7
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
8
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
9
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
10
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
11
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
12
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
13
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
14
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
15
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
16
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
17
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
18
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
19
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
20
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता हवी

By admin | Updated: January 11, 2017 00:34 IST

रवींद्र सिंघल : रस्ता सुरक्षा सप्ताह उद्घाटन

नाशिक : वाहतूक नियमांच्या वाढत्या उल्लंघनाकडे सामाजिक समस्या म्हणून पाहताना रस्ता सुरक्षेबाबत समाजात जागरूकता आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी केले.  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र कदम, पोलीस उपायुक्त विजय पाटील, श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रणजित हांडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक पी. जी. खोडसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर आदि उपस्थित होते.  अपघात कमी करण्यासाठी मानसिकतेत परिवर्तन आणणे महत्त्वाचे आहे. पोलीस आणि परिवहन विभाग मिळून रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता आणण्याचे उपक्रम आयोजित करीत आहेत. अपघाताची नोंद करताना हेल्मेट घातले असल्याबाबत नोंद करण्याच्यादेखील सूचना देण्यात आल्या ते म्हणाले. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन म्हणाले, विविध गुन्ह्यात होणाऱ्या मृत्यूपेक्षा रस्ते अपघात मानवहानीचे प्रमाण जास्त आहे. बऱ्याचदा अपघातात घरातील कर्तापुरुष गमावल्याने कुटुंबासमोर गंभीर समस्या उभी राहते. त्यामुळे सामाजिक दृष्टिकोनातून असे अपघात टाळणे महत्त्वाचे असून, हे अभियानचे उद्दिष्ट असून, शाळा- महाविद्यालयांना अशा अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली. पोलीस उपायुक्त पाटील यांनी वाहतूक नियमांबाबत स्वयंशिस्त महत्त्वाची असल्याचे नमूद करून शिक्षक आणि पालकांची भूमिका जनजागृतीसाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले. प्रास्ताविकांत कळसकर यांनी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यामागची भूमिका विशद केली. (प्रतिनिधी)