नाशिक : आडगाव येथील एका सुबाभूळच्या झाडाला असलेल्या नायलॉन मांजामध्ये कावळा अडकला होता. येथील सायकल दुकानदार दाऊद सय्यद यांच्या सदर बाब सकाळी निदर्शनास आली. त्यांनी दोन बांबूंना तार बांधून झाडाच्या फांदीला उलटा लटकून तडफडत असलेल्या कावळ्याची सुटका करण्याचा प्रयत्न केला; मात्र उंची अधिक असल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यांचा खटाटोप पाहून वृत्तपत्र विक्रेता विलास माळोदे यांनी चारचाकी वाहन झाडाखाली उभे केले. त्यानंतर सय्यद यांच्यासह पालिकेचे सफाई कर्मचारी विजय देशमुख, अशोक गायकवाड, सुरेश जाधव आदिंनी एकत्र प्रयत्न करून अखेर त्या कावळ्याची सुटका केली. दरम्यान, कावळ्याला अलगद उतरवित पाणी पाजले. काही मिनिटांनंतर कावळ्याने आकाशात सुखरूप भरारी घेतली.
जागरूक नागरिकांनी वाचविले कावळ्याचे प्राण
By admin | Updated: August 1, 2015 23:05 IST