शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

कृषी दिनानिमित्त पुरस्कार वितरण

By admin | Updated: July 1, 2017 23:52 IST

नयना गावित : शेतीपूरक व्यवसाय काळाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बदलत्या काळानुरूप शेतकरी बांधवांनी पारंपरिक शेती न करता शेतीपूरक व्यवसाय करावेत, ती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती नयना गावित यांनी केले.जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात कृषी दिनाच्या औचित्यावर जिल्हास्तरीय पीक स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे होत्या. तसेच व्यासपीठावर उपाध्यक्ष नयना गावित, सभापती मनीषा पवार, सुनीता चारोस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम जगताप, जिल्हा परिषद सदस्य महेंद्रकुमार काले, हिरामण खोसकर, यशवंत ढिकले, यशवंत शिरसाट, सुरेश कमानकर, सिमंतीनी कोकाटे, अनिता शिंदे, ज्योती वाघले, आत्मा प्रकल्प संचालक प्रशांत कांबळे, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, कैलास खैरनार आदी उपस्थित होते. यावेळी महेंद्रकुमार काले, यशवंत शिरसाट, प्रगतिशील शेतकरी सदूभाऊ शेळके, शिवनाथ बोरसे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषी विकास योजना पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कृषी अधिकारी अभिजित जमदाडे यांनी तर आभार जिल्हा कृषी विकास अधिकारी हेमंत काळे यांनी मानले.शेतकऱ्यांना पुरस्कार वितरणच्कृषी विभागामार्फत घेण्यात आलेल्या सन २०१६-१७ च्या भात पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. त्यात प्रथम क्रमांक पंढरीनाथ विठ्ठल डगळे (दोनवाडे) व सुंदराबाई हरी घुटे (फणसपाडा) यांना विभागून १० हजार, द्वितीय क्रमांक रवींद्र नारायण मौळे (हनुमाननगर) सात हजार व तृतीय क्रमांक रवींद्र मोहन वाघमारे (गावधपाडा) पाच हजार रुपये यांना देण्यात आला.