शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

औषधांच्या अतिरेकाचे दुष्परिणाम टाळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:29 IST

फार्मसी कायदा व कॉस्मेटिक अंमल बजावणी आपल्या देशात प्रभावीपणे केल्यास रु ग्णावर होणारा अतिरिक्त औषधांचा अतिरेक व त्यामुळे होणारे दुष्परिणाम यापासून रु ग्णांची होणारे आर्थिक व शारीरिक नुकसानपासून सुटका होईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.

नाशिक : फार्मसी कायदा व कॉस्मेटिक अंमल बजावणी आपल्या देशात प्रभावीपणे केल्यास रु ग्णावर होणारा अतिरिक्त औषधांचा अतिरेक व त्यामुळे होणारे दुष्परिणाम यापासून रु ग्णांची होणारे आर्थिक व शारीरिक नुकसानपासून सुटका होईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले. जागतिक फार्मसी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि.२६) जिल्हा परिषदेच्या रावसाहेब सभागृहात सामाजिक बांधीलकी म्हणून अवयव दान शिबिर नोंदणी करणे, रक्तदान शिबिर, रक्ताच्या विविध तपासण्या, नेत्रतपासणी व नेत्रदान नोंदणी करणे या कार्यक्र मांचे आयोजन केले होते. त्यावेळी महेश झगडे बोलत होते.  महेश झडगे यांनी औषध निर्माण अधिकारी संघटनेच्या कार्याचा गौरव करीत कायद्याचे कडक पालन करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी सांगितले कि.मी. शिक्षणाने फार्मसी पदवीधर असून, माझा सन्मान हा माझ्या औषध निर्माण शास्त्रातील कुटुंबीयांकडून झालेला सन्मान आहे. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आपण गत काही वर्षांपासून फार्मसी महाविद्यालयात अध्यपन करत असून, माझे विद्यार्थी या सभागृहात शासकीय सेवेतील औषध निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत असल्याबद्दल विशेष आनंद होत असल्याचे सांगितले. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनीही मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमास उपाध्यक्ष नयना रमेश गावित, शिक्षण व आरोग्य सभापती यतिंद्र पगार, अर्थ व बांधकाम सभापती मनीषा रत्नाकर पवार, महिला व बालकल्याण सभापती अपर्णा वामन खोसकर, समाजकल्याण सभापती सुनीता रामदास चारोस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा, आरोग्य उपसंचालक डॉ. लोचना घोडके, अनिल लांडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ.सुशील वाघचौरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, औषध निर्माण अधिकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष अविनाश देशमुख, कार्याध्यक्ष विजय देवरे, दशरथ वाणी, सचिन अत्रे, हेमंत राजभोज, माधवी पाटील, जनार्दन सानप, तुषार पगारे, शिवाजी मुसळे, अजित गायकवाड मधुकर आढाव, शोभा खैरनार, विजयकुमार हळदे उपस्थित होते. प्रास्ताविक औषध निर्माण अधिकारी जी. पी. खैरनार यांनी केले, तर सूत्रसंचालन श्रीमती क्षेमकल्याणी यांनी केले. उपस्थितांचे आभार सोनाली तुसे यांनी मानले.