शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलवर शिक्षणक्र म होणार उपलब्ध : दिनेश भोंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:39 IST

ज्यांना उमेदीच्या काळात शिक्षण घेता आले नाही त्यांच्यासाठी लवकरच येणाऱ्या काळात मुक्त विद्यापीठातून आॅनलाइन, मोबाइलद्वारे शिक्षणक्र म उपलब्ध करून देण्याचा मानस कुलसचिव दिनेश भोंडे यांनी बोलताना व्यक्त केला.

नाशिक : ज्यांना उमेदीच्या काळात शिक्षण घेता आले नाही त्यांच्यासाठी लवकरच येणाऱ्या काळात मुक्त विद्यापीठातून आॅनलाइन, मोबाइलद्वारे शिक्षणक्र म उपलब्ध करून देण्याचा मानस कुलसचिव दिनेश भोंडे यांनी बोलताना व्यक्त केला.  यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाचे कॅनडा कॉर्नरवरील जेएमसीटी वृत्तपत्रविद्या अभ्यास केंद्रात आयोजित युवक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी भोंडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जेएमसीटीचे अध्यक्ष शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, धनंजय माने, चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते.  यावेळी भोंडे म्हणाले, विविध कारणास्तव ज्यांना शिक्षण अर्धवटस्थितीत सोडावे लागले त्यांच्यासाठी मुक्त शिक्षणप्रणालीची पद्धत यशस्वी ठरणारी आहे.  दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते युवक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच जेएमसीटी वृत्तपत्रविद्या अभ्यास केंद्राचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला. शास्त्रीय गायन, सुगम गायन, वाद्यवादन, स्थळचित्रकला, छायाचित्रण, मृदा मूर्तिकला, वक्तृत्व, वादविवाद, मूकअभिनय, शास्त्रीयनृत्य, पाश्चात्य नृत्य आदी प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये विभागातील मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक केंद्रातील सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. स्पर्धेतील विजेते ‘इंद्रधनुष्य’ या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना प्रशस्तिपत्रकाचे वाटप करण्यात आले. स्वागत केंद्र संयोजक श्रीकांत सोनवणे यांनी केले.प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहायक कुलसचिव चंद्रकांत पवार यांनी केले. परीक्षक म्हणून ज्योती चव्हाण, आसावरी भट, विजय धरणे, शुभम सोनवणे अमित गांगुर्डे यांनी काम पाहिले.

टॅग्स :universityविद्यापीठStudentविद्यार्थीMobileमोबाइल