शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅटो डीसीआर’ प्रणाली; ३२४ प्रकरणांमध्ये त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 02:09 IST

महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम परवानग्यांसंबंधीच्या प्रकरणांचा तातडीने निपटरा होण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या आॅटो डीसीआर प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत ७२४ प्रकरणे दाखल झालेली असली तरी त्यातील ३२४ प्रकरणांमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या आहेत.

नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम परवानग्यांसंबंधीच्या प्रकरणांचा तातडीने निपटरा होण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या आॅटो डीसीआर प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत ७२४ प्रकरणे दाखल झालेली असली तरी त्यातील ३२४ प्रकरणांमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या आहेत. दरम्यान, महापालिकेने नगररचना विभागात स्वतंत्र छाननी कक्ष स्थापन करत अतिरिक्त मनुष्यबळही उपलब्ध करून दिले आहे.  महापालिकेत माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी बांधकाम परवानग्यांसाठी सुसूत्रता येण्याकरिता आॅटो डीसीआर प्रणाली कार्यान्वित केली होती. परंतु, सदर प्रणाली सदोष असल्याचे सांगत क्रेडाईसह वास्तुविशारद व अभियंत्यांच्या संघटनांनी त्यात काही आक्षेप नोंदविले होते. विकासकांच्या तक्रारी लक्षात घेऊन अभिषेक कृष्ण यांनी वैराज कलादालनात एक दिवसाची कार्यशाळाही घेतली होती. परंतु, त्यावेळी एकाच प्रकरणावर काथ्याकूट करण्यात दिवस गेला होता. दरम्यान, क्रेडाईने आॅटो डीसीआर प्रणालीत सुधारणा करण्याबरोबरच स्वतंत्र छाननी कक्ष स्थापन करण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. त्यानुसार, नगररचना विभागात छाननी कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. याठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळही पुरविण्यात आले असून, अतिरिक्त संगणक आणि प्रिंटरचीही सुविधा पुरविली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत आॅटो डीसीआर प्रणालीच्या माध्यमातून महापालिकेकडे ७२४ प्रकरणे प्राप्त झाली आहेत. त्यातील १६४ प्रकरणे निकाली काढण्यात येऊन संबंधितांना बांधकाम परवानग्या देण्यात आल्या आहेत, तर ४८ प्रकरणे प्रलंबित आहेत. मात्र, ३२४ प्रकरणांमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या असल्याने त्याबाबत निर्णय झालेला नाही.क्रेडाईकडून साहाय्य नाहीच आॅटो डीसीआर प्रणाली पूर्ण क्षमतेने जोपर्यंत कार्यान्वित होत नाही तोपर्यंत नगररचना विभागात आॅफलाइन छाननीसाठी कुशल मनुष्यबळ आणि तांत्रिक साहाय्य पुरविण्याचे आश्वासन के्रडाईने महापालिकेला दिले होते. परंतु, के्रडाईने त्याबाबत अद्याप कार्यवाही केलेली नाही. महापालिकेच्या नगररचना विभागाकडून क्रेडाईकडे याबाबत पाठपुरावा केला जातो. परंतु, त्यास प्रतिसाद मिळत नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका