शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
5
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
6
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
7
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
8
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
9
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
10
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
11
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
12
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
13
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
14
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
15
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
16
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
17
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
18
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
19
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
20
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने कामे मंजूर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 1:17 AM

खासदाराने सुचविलेल्या विकासकामांना जिल्हाधिकाºयांनी प्रशासकीय मंजुरी देण्याऐवजी जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालयातील सांख्यिकी सहायकाने परस्पर बनावट स्वाक्षरी करून कामे मंजूर केल्याचा व ठेकेदाराला हाताशी धरून कामांची देयकेही काढल्याचा प्रकार घडल्याची चर्चा असून, आर्थिक वर्षाअखेरीस देयक मंजुरीच्या पडताळणीत सदरची बाब निदर्शनास आल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून सांख्यिकी सहायक कामावरून गायब झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बोलले जात आहे.

ठळक मुद्दे सांख्यिकी सहायकाने परस्पर बनावट स्वाक्षरी करून कामे मंजूर केल्याचा प्रकारसांख्किी सहायक गेल्या १५ दिवसांपासून कामावर गैरहजर जिल्हा नियोजन अधिकायांच्या नजरेतून सदरची बाब कशी सुटली,

नाशिक : खासदाराने सुचविलेल्या विकासकामांना जिल्हाधिकाºयांनी प्रशासकीय मंजुरी देण्याऐवजी जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालयातील सांख्यिकी सहायकाने परस्पर बनावट स्वाक्षरी करून कामे मंजूर केल्याचा व ठेकेदाराला हाताशी धरून कामांची देयकेही काढल्याचा प्रकार घडल्याची चर्चा असून, आर्थिक वर्षाअखेरीस देयक मंजुरीच्या पडताळणीत सदरची बाब निदर्शनास आल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून सांख्यिकी सहायक कामावरून गायब झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बोलले जात आहे.  केंद्र व राज्य सरकारकडून लोकप्रतिनिधींना दरवर्षी मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यात खासदारांना पाच कोटी तर आमदारांना दोन कोटी रुपयांची कामे आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या निकडीवरून दरवर्षी सुचविता येतात. अशा कामांची व्यवहार्यता, गरज व उपलब्धता या बाबींची पडताळणी केल्यानंतर जिल्हाधिकाºयांकडून या कामांना प्रशासकीय मान्यता दिली जाते. जिल्हा नियोजन समितीमार्फतच सदरचे प्रशासकीय कामकाज केले जाते व संबंधित यंत्रणेकडून कामाचे अंदाजपत्रक, कामाची निविदा व ठेकेदाराची निश्चिती केली जाते. वरकरणी अतिशय साधी सोपी वाटणारी ही कामकाजाची प्रणाली असली तरी, आता कामे ठरविण्याचा व मंजूर करून घेण्यासाठी ठेकेदारच महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने व त्याला जिल्हा नियोजन समिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांची मदत लाभत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात लाखो रुपये खर्चाच्या कामाला सर्व प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्याऐवजी जिल्हा नियोजन समिती कार्यालयातील सांख्यिकी सहायकाने परस्पर सदर कामाची फाईल तयार करून त्यावर जिल्हाधिकाºयांची बनावट स्वाक्षरी केल्याचे बोलले जात आहे. मार्च महिन्यात सदर कामाचे देयक काढण्याचा प्रकार झाल्यानंतर कामाच्या मंजुरीची पडताळणी करण्यात आल्यावर ही बाब उघडकीस आली असून, तेव्हापासून सांख्किी सहायक गेल्या १५ दिवसांपासून कामावर गैरहजर असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थातच हा सारा प्रकार एकटा सांख्यिकी सहायकाकडून होणे अशक्य असल्याचे या संदर्भातील जाणकारांचे म्हणणे आहे.फाइलचा संशयास्पद प्रवाससांख्यिकी सहायकाने कामाची मंजूर केलेली फाईल अंतिम स्वाक्षरीसाठी सहायक नियोजन अधिकारी व जिल्हा नियोजन अधिकायांच्या टेबलावर जात असल्याने त्यांच्या नजरेतून सदरची बाब कशी सुटली, असा सवालही केला जात आहे. विशेष म्हणजे या साºया प्रकाराची जोरदार चर्चा होत असताना संबंधित कर्मचाºयावर कारवाई करण्याऐवजी त्याला सुट्टीवर पाठविण्यातच धन्यता मानण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय