शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

मनपाच्या बससेवेसाठी आॅगस्टचाही मुहूर्त हुकला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:59 IST

महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सेवा आॅगस्ट महिन्यात कधीही सुरू होऊ शकेल असे सांगितले गेले असले तरी अनेक कामे अपूर्ण आहेत. तसेच शासनाने प्रवासी वाहतूक म्हणून शहरात अनेक अद्याप परवानगी न दिल्याने मुहूर्त हुकला आहे. दरम्यान, सातशे वाहक आणि अन्य तांत्रिक कामे बाकी असल्याने हे काम रखडल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देप्रतीक्षाच : कामे अपूर्णच, लॉकडाऊनचाही अडथळा; तांत्रिक बाबींमुळे विलंब

नाशिक : महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सेवा आॅगस्ट महिन्यात कधीही सुरू होऊ शकेल असे सांगितले गेले असले तरी अनेक कामे अपूर्ण आहेत. तसेच शासनाने प्रवासी वाहतूक म्हणून शहरात अनेक अद्याप परवानगी न दिल्याने मुहूर्त हुकला आहे. दरम्यान, सातशे वाहक आणि अन्य तांत्रिक कामे बाकी असल्याने हे काम रखडल्याचे सांगितले जात आहे.महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाल्यानंतर तब्बल सहा वेळा बस सेवेचा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. मात्र, राज्यातील आणि महापालिकेतील सत्तारूढ भाजपाने ही सेवा महापालिकेच्या गळ्यात मारली आहे.पारंपरीक मॉडेल पेक्षा वेगळे मॉडेल म्हणून बस सेवेसाठी ठेकदाराच्या बस प्रति किलो मीटर भाड्याने चालविण्यास देण्याचे ठरविण्यात आले. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हे मॉडेल तयार केले. परंतु नंतर त्यांची बदली झाली.दरम्यान, पर्यावरण स्रेही म्हणून डिझेलच्या अवघ्या पन्नास मिडी बस तर पन्नास इलेक्ट्रीकल आणि दीडशे सीएनजी अशा साडे तीनशे बसच्या माध्यमातून बस सेवा सुरू करण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी निविदा देखील मंजुर झाल्या असून ठेकदाराने फेबु्रवारी महिन्यात आणून ठेवल्या आहेत. त्या तेथेच पडून आहे.आता वाहकांच्या ठेक्यावर नजरमहापालिकेत सातशे सफाई कामगारांची आॅऊटसोर्सिंंगने नियुक्ती तसेच पेस्ट कंट्रोलला मनुष्यबळ पुरवण्याचा ठेका गाजल्यानंतर आता वाहक भरतीवर काही ठेकेदार आणि राजकिय नेत्यांची नजर आहे. ठेकेदारीत भागीदारी करण्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. त्यामुळे हा ठेका गाजण्याची शक्यता आहे.४प्रशासनाने ठरविलेतर आॅगस्ट महिन्यात ही सेवा सुरू करण्याची तयारी केवळ कागदावरच राहीली आहे. सध्या शासनाने मिशन बिगेन सुरू केले असले तरी शहरातील बस आणि रिक्षा बंदच आहे. त्याचा परिणाम देखील जाणवत आहे. महापालिकेने बस सेवा सुरू केलीच तर ती ततत्काळ पूर्ण क्षमतेने सुरू होणार नाही तर केवळ काही रूटवर ही सेवा देण्याचा प्रस्ताव आहे. सध्या तरी लॉकडाऊनमुळे महापालिकेचा प्रस्ताव रखडलेलाच आहे.महापालिकेच्या वतीने आडगावतसेच तपोवन येथे बस स्थानकाचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. मात्र, त्यात फार प्रगती नाही. नाशिकरोड येथील सिन्नर फाटा तसेच आनंद नगर येथील स्थानक महापालिकेला मिळाल्यागत जमा आहे. तथापि, तेथेही अंतिम कामे झालेली नाहीत. सर्वात महत्वाचे म्हणजे इंटीग्रेटेड ट्रॅफीक मॅनेजेमेंट सिस्टीम्स आणि सातशे वाहनचालक भरण्याच्या ठेक्याचा अद्याप फैसला झालेला नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटीBus Driverबसचालक