शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कांदा गोणीत आला तरच लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:38 IST

मजूर उपलब्ध नसल्याचे कारण देत लासलगाव बाजार समितीचे कांदा लिलाव अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले होते. याच कारणासाठी गुरुवारी (दि.२६) दुपारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये तहसीलदार दीपक पाटील ,सहाय्यक निबंधक अभिजित देशपांडे, सभापती सुवर्णा जगताप आणि व्यापारी वर्गाची बैठक संपन्न झाली.

ठळक मुद्देलासलगाव : बाजार समितीने घेतला निर्णय

लासलगाव : मजूर उपलब्ध नसल्याचे कारण देत लासलगाव बाजार समितीचे कांदा लिलाव अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले होते. याच कारणासाठी गुरुवारी (दि.२६) दुपारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये तहसीलदार दीपक पाटील ,सहाय्यक निबंधक अभिजित देशपांडे, सभापती सुवर्णा जगताप आणि व्यापारी वर्गाची बैठक संपन्न झाली. दीड तास चाललेल्या या बैठकीत कांदा पिशवीमध्ये आणला तरच कांदा लिलाव सुरू करण्याच्या भूमिकेवर व्यापारी ठाम राहिले. अखेर कांदा गोणीत आला तरच लिलावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.दरम्यान, कांदा गोणी लिलावाचा प्रयत्न यापूर्वी झालेला होता, परंतु बारदान गोणीचा खर्च परवडण्याजोगा नसल्याने शेतकऱ्यांनी त्यास विरोध केला होता. त्यामुळे आता ऐन वेळेस जाहीर केल्याप्रमाणे कांदा उत्पादक या आव्हानाला तयारी अभावी प्रतिसाद कमी देण्याची भीती आहे. दरम्यान, बैठकीत पणन मंडळाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार सुरळीत रहाणे आवश्यक असल्याचे तहसीलदार दिपक पाटील यांनी सांगितले. तर व्यापारी प्रतिनिधीने मजूर टंचाईचे कारण देत लिलाव कांदा गोणी मध्ये व्हावे अशी मागणी केली. परंतु कोरोनामुळे कोणत्याच व्यापाºयाकडे कांदा गोणीचा साठा नसल्याने आता व्यापाऱ्यांनी ४० किलोचा कांदा गोणीत विक्रीस आणावा असा अट्टाहास धरला. यावेळी डी. के. जगताप, सचिव नरेंद्र वाढवणे उपस्थित होते.जनता कर्फ्यूनंतर कांदा गोणी शिवणेदेखील बंद आहे. त्यामुळे कांदा पिशवी शिवण्याचे काम ठप्प झाले आहे. या परिस्थितीची माहिती असतानादेखील बैठकीत कांदा लिलाव सुरू करण्याबाबत टोलवाटोलवीची भूमिका दिसून आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarket Yardमार्केट यार्ड