शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

कर्जवसुलीसाठी जमिनींचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 01:35 IST

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याकरिता थकबाकी वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यात आली असून, मार्चपासून धडक वसुली मोहीम सुरू करण्यात येऊन त्यात विविध कार्यकारी संस्थांच्या मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तेवर सहकार कायदा नियम १०७ अन्वये बँकेचे नाव लावून जमीन जप्ती करून जमिनीच्या लिलावाच्या प्रक्रिया करण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहे.

ठळक मुद्देजिल्हा बॅँक : सुरू केली धडक कारवाई

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याकरिता थकबाकी वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यात आली असून, मार्चपासून धडक वसुली मोहीम सुरू करण्यात येऊन त्यात विविध कार्यकारी संस्थांच्या मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तेवर सहकार कायदा नियम १०७ अन्वये बँकेचे नाव लावून जमीन जप्ती करून जमिनीच्या लिलावाच्या प्रक्रिया करण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहे.नाशिक तालुक्यातील शिलापूर येथील माधव रामचंद्र कहांडळ यांच्याकडे दोन लाख ६६ हजारांची थकबाकी आहे. त्यांना सात दिवसांची नोटीस बजावण्यात आली होती. १९९७ पासून थकबाकीदार असलेले कहांडळ यांच्या ५ एकर ११ गुंठे जागेचा जाहीर लिलाव ३१ मे रोजी केला जाणार आहे. याबाबत जाहीर लिलावाची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली असून, येवला तालुक्यातील जळगाव नेऊर दशरथ जयाजी शिंदे, कोटमगाव विका संस्थेचे थकबाकीदार सभासद मुरलीधर गोपीनाथ कोटमे, देवठाण विका संस्थेचे थकबाकीदार नंदू विठ्ठल जाधव व शेकू लक्ष्मण वºहे यांच्याही शेतजमीन विक्रीची जाहीर लिलावाची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जमिनीचे जाहीर लिलाव जळगाव नेऊर येथे ३१ मे रोजी, कोटमगाव येथे ४ जून रोजी व देवठाण येथे ७ जून रोजी लिलाव केला जाणार आहे.बँकेचे आवाहनकायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिंडोरी, निफाड, मालेगाव व सटाणा या तालुक्यातील मोठ्या प्रभावशाली थकबाकीदारांच्या शेत जमिनीचे लिलाव करण्यात येणार आहे. तरी जिह्यातील थकबाकीदार सभासदांनी कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा लवकरात करून बँकेस सहकार्य करावे, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकbankबँकFarmerशेतकरी