शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट इच्छुकांची रॅलीत लक्षवेधी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:48 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने निघालेल्या रोड शो मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची धडपड लक्षवेधी ठरली असून, त्यासाठी इच्छुकांनी लढविलेल्या शकला व क्लृप्त्या यात्रेच्या दरम्यान चर्चेच्या ठरल्या.

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने निघालेल्या रोड शो मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची धडपड लक्षवेधी ठरली असून, त्यासाठी इच्छुकांनी लढविलेल्या शकला व क्लृप्त्या यात्रेच्या दरम्यान चर्चेच्या ठरल्या. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी या इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघात शक्तिप्रदर्शनाची कोणतीही संधी सोडली नाही.नाशिक येथे महाजनादेश यात्रेचा समारोप करण्यात येणार असल्याचे जाहीर झाल्यापासूनच विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी अनेक माध्यमांचा वापर करीत पक्षनेत्यांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. काहींनी यात्रा मार्गाची पाहणी करण्याचा फार्स केला तर काहींनी समारोपाच्या सभास्थळावर अधिकाऱ्यांसह भेटी दिल्या.त्याचबरोबर विधानसभा मतदारसंघात यात्रा व जाहीर सभेची पत्रके वाटून स्वत:ची छबी घराघरांत पोहोचविली. मुख्यमंत्र्यांचे आगमन होण्यापूर्वी इच्छुकांनी रथाचा ताबा घेऊन जागाही सांभाळली होती. मात्र विशेष पोलीस पथक व बॉम्ब शोधक पथकाने या रथाची तपासणी केली असता, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी सदरचा रथ योग्य नसल्याचा अहवाल दिला.दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शहरातील तीनही विधानसभा मतदार संघातून मार्गस्थ झाल्याने त्यांच्या रथावर भाजपाचे महाराष्टÑ प्रभारी भुपेंद्र यादव, पालकमंत्री गिरीष महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप आदी विराजमान झाले होते.नगरसेवकाकडून असाही सत्कारसिडकोतून मार्गक्रमण होत असताना वेगवेगळ्या नगरसेवकांनी त्यांच्या भागातील चौकांमध्ये अत्यंत जल्लोषात ढोल-ताशे, फुलांचे मोठे पुष्प क्रेनला बांधलेला हार घालत स्वागत केले. मात्र, भाजपाचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी थेट सिडकोच्या त्रिमूर्ती चौकाच्या अलीकडे स्वत:सह चिरंजिवांना क्रेनमध्ये उभे करून मुख्यमंत्र्यांना हार घालून सत्कार केला. त्यावेळी क्रेनच्या पंजात उभे राहून हार घातला.शिवसेनेचे नगरसेवक स्वागतालासिडकोतील सर्व विधानसभा इच्छुक उमेदवार आणि भाजपा नगरसेवकांकडून मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत केले जात असतानाच शिवसेनेच्या एका नगरसेवकानेदेखील मुख्यमंत्र्यांचे सपत्नीक स्वागत केले. युती जाहीर झालेली नसतानाही शिवसेनेचे नगरसेवक दांपत्य सत्काराला तत्पर उभे असल्याने त्याचीदेखील चर्चा झाली.दोन हजारांहून अधिक बाइकस्वारमहाजनादेश यात्रेच्या अंतिम टप्प्याच्या निमित्ताने बुधवारी नाशकात दाखल झालेल्या मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी सिडकोचे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. सुमारे दोन हजारांहून अधिक बाइकस्वारांच्या उपस्थितीत पाथर्डी फाट्यावरून बाइक रॅलीला प्रारंभ झाला.

टॅग्स :BJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्रीElectionनिवडणूक