शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
4
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
5
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
6
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
8
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
9
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
10
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
11
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
12
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
13
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
14
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
15
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
16
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
17
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
18
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
19
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
20
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!

पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:39 AM

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ असलेल्या भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची कोंडी करून आपली भूमिका संदिग्ध ठेवल्यामुळे सेनेचे नरेंद्र दराडे हवालदिल झाले असून, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नाशिक भेटीत यासंदर्भात निर्णयाची अपेक्षा धरून बसलेल्या शिवसेनेला आता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नाशिक दौºयाचे वेध लागले आहेत.

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ असलेल्या भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची कोंडी करून आपली भूमिका संदिग्ध ठेवल्यामुळे सेनेचे नरेंद्र दराडे हवालदिल झाले असून, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नाशिक भेटीत यासंदर्भात निर्णयाची अपेक्षा धरून बसलेल्या शिवसेनेला आता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नाशिक दौºयाचे वेध लागले आहेत. शिवसेनेप्रमाणेच जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी यांनादेखील महाजन काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे.  राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी भाजपा व शिवसेनेने प्रत्येकी तीन जागांवर उमेदवार उभे करून अप्रत्यक्ष युती केली असली तरी, त्याबाबतची घोषणा मात्र केलेली नाही. एकमेकांच्या सहमतीने उमेदवार उभे करण्यात आले, परंतु ज्या ठिकाणी भाजपाचा उमेदवार असेल तेथे सेनेने व जेथे सेनेचा उमेदवार असेल तेथे भाजपाने काय भूमिका घ्यावी याबाबत संदिग्धता ठेवली आहे. त्यासंदर्भातील कोणतेही आदेश दोन्ही पक्षांनी आपल्या मतदारांना दिलेले नाहीत. त्यामुळे नाशिक मतदारसंघात शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी दाखल केली असली, तरी भाजपाच्या मतांवर डोळा ठेवून जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी यांनी उमेदवारी जाहीर करून तिरंगी लढतीत रंग भरला आहे. विशेष म्हणजे, कोकणी यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून भाजपा नगरसेवकांच्या स्वाक्षºया असून, गेल्या आठ दिवसांपासून भाजपाचे पदाधिकारी व जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर हे उघड उघड कोकणी यांचा प्रचार करीत असल्यामुळे कोकणींच्या उमेदवारीला भाजपाची फूस असल्याचाच अर्थ काढला जात आहे. तथापि, याबाबत ना शिवसेनेने भाजपाला जाब विचारला, ना भाजपानेही शिवसेनेला पूरक भूमिका घेतली.  अशा संदिग्ध वातावरणात विधान परिषदेची निवडणूक रंगात आलेली असताना दराडे मात्र हवालदिल झाले आहेत. शिवसेनेनंतर भाजपाचे संख्याबळ दुसºया क्रमांकावर आहे. स्थानिक भाजपाने वरिष्ठांचे आदेश नसल्याचे सांगत शिवसेनेपासून दूर झाले आहेत.शिवसेनेचे शिष्टमंडळ भेट घेणारसुरगाणा येथे सामूहिक विवाहाच्या निमित्ताने नाशिक दौºयावर आलेले पालकमंत्री गिरीश महाजन नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत काही तरी निर्णय घेतील अशी अपेक्षा शिवसेना बाळगून असून, यासंदर्भात शिवसेनेचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे. महाजन यांच्या भेटीबाबत परवेज कोकणीदेखील उत्सुक असल्यामुळे येत्या दोन दिवसांत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकShiv Senaशिवसेना