शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

आयोगाचे असणार प्रत्येक ईव्हीएमवर लक्ष

By श्याम बागुल | Updated: September 1, 2018 14:44 IST

आयोगाच्या या कृतीमुळे ईव्हीएम यंत्रातील हेराफेरी वा छेडछाडीच्या संभाव्य टिकेलाही प्रत्युत्तर देणे सोपे झाले आहे. निवडणूक आयोगाने यापुर्वीच्या निवडणुकीत वापरण्यात आलेली सर्व ईव्हीएम यंत्रे परत बोलावून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत नवीन यंत्राचा वापर शिवाय त्याला व्हीव्हीपॅटने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घोषणाही आयोगाने करून व्हीव्हीपॅट वापराचे फायदेही मतदारांना सांगण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देबारकोडींगने ट्रॅकींग : स्ट्रॉँगरूमही नजरेच्या टप्प्यात जिल्ह्या-जिल्ह्यांना नवीन बॅलेट व कंट्रोल युनिटचे वाटप केले जात आहे.

नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच राजकीय वातावरण तापायला सुरूवात झालेली असल्यामुळे निवडणूक प्रक्रियेला कोणतीही बाधा पोहोचू नये यासाठी निवडणूक आयोगाने आत्तापासूनच सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलायला सुरूवात केली असून, त्याचाच भाग म्हणून निवडणूकीत वापरण्यात येणाऱ्या नवीन ईव्हीएम यंत्राला बारकोड क्रमांक देण्याबरोबरच यंत्र ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉँगरूमला अक्षांश-रेखांशने जोडून प्रत्येक मतदान यंत्रावर बारकाईने नजर ठेवण्याची प्रक्रिया राबविली आहे. आयोगाच्या या कृतीमुळे ईव्हीएम यंत्रातील हेराफेरी वा छेडछाडीच्या संभाव्य टिकेलाही प्रत्युत्तर देणे सोपे झाले आहे.निवडणूक आयोगाने यापुर्वीच्या निवडणुकीत वापरण्यात आलेली सर्व ईव्हीएम यंत्रे परत बोलावून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत नवीन यंत्राचा वापर शिवाय त्याला व्हीव्हीपॅटने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घोषणाही आयोगाने करून व्हीव्हीपॅट वापराचे फायदेही मतदारांना सांगण्यास सुरूवात केली आहे. सर्व विरोधीपक्षांकडून गेल्या काही वर्षापासून आयोगावर ईव्हीएम घोटाळ्याचे आरोप होत असून, ते धुवून काढण्यासाठी आयोगाने नवनवीन पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. सध्या आयोगाकडून प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी जिल्ह्या-जिल्ह्यांना नवीन बॅलेट व कंट्रोल युनिटचे वाटप केले जात आहे. ज्या ज्या जिल्ह्यांना ही यंत्रे मिळाली त्या यंत्रावर बारकोड टाकण्यात आले असून, सदरच बारकोडचे स्कॅनिंग करून ते आयोगाच्या साईटवर टाकण्याची सक्ती करण्यात आली आहे. जेणे करून कोणत्या मतदार संघासाठी कोणत्या क्रमांकाचे मतदान यंत्राचा वापर होणार आहे याची माहीती आयोगाला त्यांच्या दिल्लीस्थित कार्यालयात बसून कळणार आहे. याशिवाय या मतदान यंत्राशी कुठल्याही प्रकारची छेडछाड अथवा हेराफेरी होवू नये याची देखील आयोगाने काळजी घेतली असून, ज्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात ईव्हीएम ठेवण्यात आले, त्या स्ट्रॉँगरूमचे लोकेशन देखील आयोगाने मागविले आहे. त्यासाठी मतदान यंत्र ठेवलेले गोदाम अथवा सभागृहाचे अक्षांश-रेखांश जीपीएसच्या माध्यमातून आयोगाकडे पाठविण्यात आले असून, आयोगाचे अधिकारी दिल्लीहून सदरचे गुदाम, सभागृहावर लक्ष ठेवू शकणार आहे.निवडणूक आयोगाकडून मतदान यंत्राबाबत घेतली जात असलेली खबरदारी पाहता, त्याच धर्तीवर जिल्हा पातळीवर देखील आता निवडणूक शाखेने प्रत्येक ईव्हीएम यंत्राची बारकोडींगद्वारे स्थानिक पातळीवर माहिती संकलित करण्यात आली असून, जेणे करून कोणते यंत्र कोणत्या विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर वापरण्यात आले ते पाहणे सोपे होणार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक