शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोवळ्या जीवासह बैठकीस उपस्थित राहून महिला सरपंचांनी दर्शविली विकासाप्रती निष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 01:04 IST

किसन काजळे नांदूरवैद्य : गावाच्या विकासासाठी आतापर्यंत कोणी विविध प्रकारे योगदान दिले असेल तर कोणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ...

ठळक मुद्देमायदरा-धानोशी ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत आश्चर्याचा धक्का

किसन काजळेनांदूरवैद्य : गावाच्या विकासासाठी आतापर्यंत कोणी विविध प्रकारे योगदान दिले असेल तर कोणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी स्वतःच्या विहिरीतील पाणी दिले असेल; परंतु गावाच्या विकासकामांबाबत आयोजित महत्त्वाच्या मासिक बैठकीसाठी चक्क अवघ्या नऊ दिवसांच्या गोंडस बाळासह हजेरी लावून इगतपुरी तालुक्यातील मायदरा-धानोशी येथील सरपंच पुष्पा बांबळे यांनी ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्का दिला.इगतपुरी तालुक्यातील मायदरा, धानोशी, ठोकळवाडी या ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत विविध विकासकामांबाबत मासिक बैठकीचे आयोजन ग्रामसेवक नितेश हेंबाडे व ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते; परंतु या बैठकीला सरपंच हजर राहणार नाहीत, असे याआधीच घोषित करण्यात आले असल्यामुळे बैठकीला सुरुवात करण्याचे ठरले; परंतु काही वेळातच सरपंच पुष्पा बांबळे य ओल्या बाळंतीण आपल्या नऊ दिवसाच्या चिमुकल्याला घेऊन बैठकीला हजर होताच उपस्थित ग्रामसेवक, सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ आश्चर्यचकीत झाले.सरपंच बांबळे आसनस्थ झाल्यानंतर बैठकीला सुरुवात झाली. या नियोजित बैठकीत शिवार रस्ता वीज, पाणी, दलित वस्तीतील विकास कामे, घरकुल योजना आढावा, शबरी घरकुल योजना, रमाई घरकुल योजना याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला ग्रामसेवक नितेश हेंबाडे, चंद्रभागा केवारे, लंकाबाई बांबळे, गंगाराम करवंदे, साहेबराव बांबळे, बहिरु केवारे, ग्रामपंचायत कर्मचारी गोरख धोंगडे, रंगनाथ लोहकरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.गावाच्या विकासकामांबाबत महत्त्वाची बैठक असल्याने उपस्थित राहणे गरजेचे होते. गावासाठी कुठलीही परिस्थिती असो, मागे-पुढे न पाहता आपण गाव विकासासाठी सदैव तत्परता दाखवली असून, यापुढेही याच उत्साहाने कार्यरत राहीन.- पुष्पा बांबळे, सरपंच, मायदरा-धानोशी. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSocialसामाजिक