शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
4
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
5
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
6
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
7
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
8
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
9
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
10
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
11
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
12
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
13
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
14
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
15
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
16
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
17
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
18
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
19
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
20
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

साडेतीन हजार विवाहेच्छुकांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:21 IST

महानगर तेली समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विवाहेच्छुक युवक-युवतींच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये सुमारे तीन हजार ८५० युवक-युवतींसह त्यांच्या पालकांनी हजेरी लावली.

नाशिक : महानगर तेली समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विवाहेच्छुक युवक-युवतींच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये सुमारे तीन हजार ८५० युवक-युवतींसह त्यांच्या पालकांनी हजेरी लावली.  सालाबादप्रमाणे यंदाही तेली समाजाच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. भाभानगरमधील दादासाहेब गायकवाड सभागृहात झालेल्या या मेळाव्याप्रसंगी उद्घाटक म्हणून जनार्दन बेलगावकर उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, नगरसेवक गजानन शेलार, प्रवीण चांदवडकर, विक्रांत चांदवडकर, संतोष चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बेलगावकर म्हणाले, मुलामुलींचा विवाह ठरविताना तडजोड करण्याचा प्रयत्न करावा. तडजोड केल्यास विवाह जुळून येण्यास मदत होेते. तसेच संयोजक वाघ यांनी यावेळी मनोगतातून समाजातील विवाहसंस्काराविषयी माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, प्रत्येक समाजात विवाहसंस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रत्येकाने आपआपल्या जातीचा अभिमान बाळगावा. विवाहेच्छुकांचा पालक परिचय मेळावा आयोजित करण्यामागे हा मुख्य उद्देश असतो. आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडताना अशा प्रकारच्या मेळाव्यांची मोठी मदत होते. अनुरूप जोडीदाराचा शोध अशा मेळाव्यांच्या माध्यमातून पूर्ण होतो.  दरम्यान, चांदवडकर यांनी कांचन कर्डिले यांनी सुरू केलेल्या विवाहाच्या संकेतस्थळाविषयीची माहिती दिली. यामुळे मेळाव्यानंतरही विवाहेच्छुकांना अनुरूप जोडीदार शोधण्यासाठी या संकेतस्थळाची मदत होणार आहे. तसेच समाजातील तरुण-तरुणींनी अभ्यासाबरोबर क्रीडा क्षेत्राकडे वळण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी विविध तरुण-तरुणींची संपूर्ण माहिती असलेली वधू-वर सूचक पुस्तिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. या मेळाव्याला समाजातील सुशिक्षित, नवशिक्षित नोकरदार व व्यावसायिकांसह शेतकरी वर्गातील विवाहेच्छुक तरुण-तरुणी व त्यांचे पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन योगिता क्षीरसागर, सीमा पेठकर यांनी केले. नवनिर्वाचित नगरसेवकांसह समाजभूषणांचा गौरव विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून समाजाचा नावलौकिक उंचाविणाºया समाजभूषण व्यक्तींचा या मेळाव्याच्या निमित्ताने गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. भूषण कर्डिले, नगरसेवक स्वप्निल शेलार, शीतल उगले, इगतपुरीचे नगरसेवक उमेश कस्तुरे, नंदुरबारचे नगरसेवक प्रवीण चौधरी, रेखा चौधरी, गौरव चौधरी, तळोद्याचे नगरसेवक सुभाष चौधरी, गायत्री चौधरी या नवनिर्वाचित नगरसेवकांसह तृप्ती चांदवडकर (रौप्य- तलवारबाजी), निंबा चौधरी (व्यसनमुक्ती), मोहन कोरडे, यू. बी. पवार (शहर अभियंता) यांचाही गौरव करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक