शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पालखी समितीचे मन वळविण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:40 IST

नाशिक : संत निवृत्तिनाथ महाराज पालखीच्या स्वागत सोहळ्यासाठी नाशिक पंचायत समितीची नूतन जागा शोधण्यात आल्यानंतर महापालिकेच्या वतीने पदाधिकाऱ्याचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्वीच्या जागी म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावाजवळच स्वागत करण्यासाठी महापालिकेचा आग्रह आहे. मात्र, स्वागत समितीने विनम्रपणे नकार दिला आहे. याशिवाय शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी मानधन एकत्र करून वारकºयांना टाळ-चिपळ्या देण्याची तयारी दर्शवली असली तरी हे पक्षाने त्यांच्या व्यक्तिगत पातळीवरच करावे, समितीचा राजकारणाशी संबंध नसल्याचा निर्वाळाही देण्यात आला आहे.

ठळक मुद्देपदाधिकारी ठाम व्यक्तिगत मदत देण्याचा सेनेला सल्ला

नाशिक : संत निवृत्तिनाथ महाराज पालखीच्या स्वागत सोहळ्यासाठी नाशिक पंचायत समितीची नूतनजागा शोधण्यात आल्यानंतर महापालिकेच्या वतीने पदाधिकाऱ्याचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्वीच्या जागी म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावाजवळच स्वागत करण्यासाठी महापालिकेचा आग्रह आहे. मात्र, स्वागत समितीने विनम्रपणे नकार दिला आहे. याशिवाय शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी मानधन एकत्र करून वारकºयांना टाळ-चिपळ्या देण्याची तयारी दर्शवली असली तरी हे पक्षाने त्यांच्या व्यक्तिगत पातळीवरच करावे, समितीचा राजकारणाशी संबंध नसल्याचा निर्वाळाही देण्यात आला आहे.संत निवृत्तिनाथ महाराज पालखीचे आगमन २९ जून रोजी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे त्यासाठी मंडप उभारण्यास शासनाच्या परिपत्रकाचा अडथळा असल्याचे महापालिकेने संत निवृत्तिनाथ महाराज पालखी समितीला कळविल्यानंतर समितीने त्यासंदर्भात कोणत्याही प्रकारे विरोध न करता कार्यक्रमाचे स्थळ बदलले आणि नाशिक पंचायत समितीच्या आवारात पालखीचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला. भाजपाचे नगरसेवक जगदीश पाटील यांनी याठिकाणी स्वखर्चाने मंडप उभारण्याची तयारी केली असून,पाणीपुरवठा व इतर अनेक सुविधा पंचायत समितीने पुरवण्याची तयारी दर्शविली आहे. ‘लोकमत’मध्ये याबाबत वृत्त आल्यानंतर महापालिकेने आता स्वागत समितीच्या पदाधिकाºयांशी संपर्क साधून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. नेहमीप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाजवळ स्वागत करण्याचे आवाहन केले. पालखी सोहळ्यासाठी मंडप वगळता अन्य सुविधा पुरवण्याची तयारी दर्शवली. इतकेच नव्हे तर जगदीश पाटील यांनादेखील एका अधिकाºयाने दूरध्वनी करून मंडप तरणतलावाजवळ उभारण्यास सांगितले. मात्र, त्यांनीही ते पालखी स्वागत समितीवर निर्णय सोपवल्याचे वृत्त आहे.दरम्यान, शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक बुधवारी (दि.२०) संपन्न झाली. यावेळी नगरसेवकांचे मानधन जमा करून त्यातून पालखी सोहळ्यासाठी सर्व खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला. वारकºयांना टाळ-मृदंग हे सर्व त्यातून देण्याचे ठरविण्यात आले.यासंदर्भात गटनेता विलास शिंदे यांनी समिती अध्यक्ष पद्माकर पाटील यांना कळविले. मात्र स्वागत समितीने अशाप्रकारचा उपक्रम समितीच्या माध्यमातून न करता पक्षीय पातळीवर त्याच ठिकाणी करावा, असे पाटील यांनी सूचविले आहे.तयारीचा घेणार आढावा स्वागत समितीची बैठक आता रविवारी (दि.२४) होणार असून, त्यात तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी गुरुवारी (दि. २१) पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना समिती निमंत्रण देणार आहे.