शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक ‘सायकल कॅपिटल’ बनविण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:35 IST

वाइन कॅपिटल त्याचबरोबर धार्मिक शहर, अशी ओळख असलेल्या नाशिक शहराची आता सायकल चळवळीमुळे वेगळी ओळख पुढे येत आहेच, त्यालाच अनुसरून महापालिकेनेदेखील आता ‘सायकलींचे शहर’ ही ओळख पुढे नेण्यासाठी शेअर सायकलिंगवर भर दिला असून, येत्या दिवाळीपर्यंत पाचशे, तर पुढील जून महिन्यापर्यंत एक हजार सायकली भाड्याने वापरता येऊ शकतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

नाशिक : वाइन कॅपिटल त्याचबरोबर धार्मिक शहर, अशी ओळख असलेल्या नाशिक शहराची आता सायकल चळवळीमुळे वेगळी ओळख पुढे येत आहेच, त्यालाच अनुसरून महापालिकेनेदेखील आता ‘सायकलींचे शहर’ ही ओळख पुढे नेण्यासाठी शेअर सायकलिंगवर भर दिला असून, येत्या दिवाळीपर्यंत पाचशे, तर पुढील जून महिन्यापर्यंत एक हजार सायकली भाड्याने वापरता येऊ शकतील, असे नियोजन करण्यात आले आहे.  महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही माहिती शनिवारी (दि.२२) वॉक विथ कमिशनर कार्यक्रमाच्या वेळी दिली. शनिवारी जागतिक वाहन विरोधी दिन असल्याने नाशिक सायकलिस्टच्या वतीने आयुक्तांची याच ठिकाणी भेट घेण्यात आली आणि वाइन कॅपिटलप्रमाणेच नाशिकची ओळख सायकल कॅपिटल म्हणून व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यावेळी मुंढे यांनी माहिती दिली.आरोग्याच्या दृष्टीने सायकलिंगची चळवळ वाढत असून, शहरात सायकलिंग करणारे ग्रुप तयार झाले आहेत. राज्यात सर्वाधिक सायकली नाशिक शहरात विकल्या जातात, असे नाशिक सायकलिस्ट या संस्थेच्या वतीने किरण चव्हाण यांनी सांगितले. महापालिकेनेदेखील पर्यावरणाच्या दृष्टीने नॉन मोटार व्हेईकल म्हणून सायकल चालविणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत शेअर सायकलिंगवर भर दिला आहे. महापालिकेने खासगीकरणातून ही सेवा देण्याचे कंत्राट दिले असून, पुढील महिन्यापासून काम सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे १०० सायकली उपलब्ध होणार असून, पाचशे सायकली दिवाळीपर्यंत उपलब्ध होईल, तर आगामी जून महिन्यापर्यंत एक हजार सायकली शेअरिंगसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. अ‍ॅपद्वारे सायकल बुकिंग, आॅनलाइन पेमेंट आणि जीपीएस ट्रॅकिंग अशाप्रकारची अद्ययावत सेवा असणार आहे.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका