शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

आराईगाव कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 00:42 IST

जुनी शेमळी : ग्रामपंचायत प्रशासनाने तालुक्याच्या ठिकाणी लसिकरणासाठी नागरिकांची हेळसांड होऊ नये यासाठी गावातच लसीकरण मोहीम राबविण्याचे ठरविले तसा पत्रव्यवहार वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आला व त्यास यश आले. त्यामुळे गावातच नागरीकांकरीता लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले असून त्याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत : नागरिकांसाठी गावातच केले कोविडचे लसीकरण

जुनी शेमळी : ग्रामपंचायत प्रशासनाने तालुक्याच्या ठिकाणी लसिकरणासाठी नागरिकांची हेळसांड होऊ नये यासाठी गावातच लसीकरण मोहीम राबविण्याचे ठरविले तसा पत्रव्यवहार वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आला व त्यास यश आले. त्यामुळे गावातच नागरीकांकरीता लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले असून त्याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.गेल्या वर्षभरापासून सुरु असलेला हा कोरोना आता शहरापाठोपाठ खेड्यांकडेही तितक्याच तीव्रतेने पसरत आहे. प्रशासन आपली जबाबदारी पार पाडत आहे. परंतु गावात गेल्या महिना दीड महिन्यापासून कोरोनाची रुग्ण संख्या वाढतच होती. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी विविध प्रकारच्या फवारण्या करण्यात आल्या. शेवटी जनता कर्फ्यु लावण्यात येऊन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सलग पाच दिवस गाव कडक बंद ठेवण्यात आले. कुणीही घराबाहेर अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडत नव्हते. आता ग्रामपंचायत प्रशासनाने तालुक्याच्या ठिकाणी नागरिकांची हेळसांड होऊ नये म्हणून गावातच लसीकरण मोहीम सुरु केली.ग्रामपंचायत सरपंच मनीषा आहिरे, उपसरपंच अनिल माळी, सदस्य माधव आहिरे, डॉ. गोकुळ आहिरे यांनी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत अहिरराव, ब्राम्हणगाव आरोग्य केंद्राचे डॉ. कांबळे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत लसीकरणासाठी ३०० ते ४०० लसीचे डोस उपलब्ध करून दिले.आरोग्य विभागाकडून बुधवारी (दि.२८) एकाच दिवसात सुमारे ४०० ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात येईल असे नियोजन केले. तसेच ज्या व्यक्तीना काही लक्षणे असतील अशा ग्रामस्थांची रॅपीड टेस्ट करण्यात आली. यावेळी लसीकरणाचा ग्रामस्थांनी चांगला लाभ घेतला.नागरिकांना उन्हामुळे त्रास होऊ नये यासाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली व सोशल डिस्टंसिंगचे पालन करत सर्वांचे लसीकरण व रॅपीड टेस्ट करून योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती साधना आहिरे, दिलीप आहिरे, माजी उपसभापती परशुराम आहिरे,अश्विन आहिरे आदी उपस्थित होते. तर लसिकरणासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षक, ग्रामविकास अधिकारी सुभाष भामरे ग्रामपंचायत लिपिक स्वप्निल आहिरे, राहुल पानपाटील, शिपाई दिनेश गायकवाड, भाऊसाहेब आहिरे, वसंत भदाने, गौतम गरुड, भारत अहिरे, आरोग्य कर्मचारी डॉ.अलिना सय्यद, सचिन भदाने, एन. एम. पवार, प्रतिभा खैरनार, मनिषा गोसावी, सारिका बच्छाव, सुशिला मल्ले आदींनी परिश्रम घेतले.लसीकरणावेळी गट विकास अधिकारी हेमंत काथेपुरी यांनी भेट देवून समाधान व्यक्त केले.आजची परिस्थिती पाहता सर्वसामान्य नागरिकांची हेळसांड होत असल्याने व त्यांची होणारी पिळवणूक थांबावी व त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. पुढील काळात देखील असेच यशस्वी लसीकरण मोहिम राबवून गावातून कोरोनाचा समूळ नायनाट करणार आहोत.- मनिषा अहिरे, लोकनियुक्त सरपंच.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्या