शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पित्याकडून शाळकरी मुलीला किटकनाशके पाजण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 18:22 IST

माता-पित्याच्या नाते जगात सर्वश्रेष्ठ मानले जाते; मात्र या कलियुगात या नातेसंबंधालाही काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत.

ठळक मुद्दे धक्कादायक प्रकार रविवारी (दि.२१) शिंदे गावात उघडकीस आला. शैक्षणिक साहित्यांची मागणी वडिलांकडे केली. त्याचा राग

नाशिक : ज्या मुलांना जन्माला घातले त्या किशोरवयीन मुलांना बळजबरीने चक्क जन्मदात्या पित्याने विष पाजण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.२१) शिंदे गावात उघडकीस आला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित पित्याविरूध्द जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल क रण्यात आला आहे.‘माृत-पितृ देवो भव:’ अशी आपली संस्कृती असून आई-वडिलांना सर्वोच्च दर्जा दिला जातो. माता-पित्याच्या नाते जगात सर्वश्रेष्ठ मानले जाते; मात्र या कलियुगात या नातेसंबंधालाही काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. काही दिवसांपुर्वीच चिमुकलीला आईने गळ्यावर ब्लेडने वार करून ठार मारल्याची संतापजनक घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास गती घेत नाही तोच पुन्हा शिंदे गावात बळजबरीने पित्याने आपल्या शाळकरी मुलीच्या तोंडात किटकनाशके टाकून ठार मारण्याचा केलेला प्रयत्नही तितकाच संतापजनक आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित पंढरीनाथ बाबुराव बोराडे (४८,रा. शिंदेगाव) याने आपल्या लहान मुलामुलींना बळजबरीने विषारी किटकनाशके पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. मुलीने शैक्षणिक साहित्याच्या मागणी केल्यामुळे संतापलेल्या मद्यपी बापाने तीला बळजबरीने किटकनाशके पाजण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. यावेळी घरात मुलांची आई नव्हती. याप्रकरणी पित्याविरूध्द मुलाने नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या बहिणीने शाळेचा गणवेश, पाठ्यपुस्तके आदि शैक्षणिक साहित्यांची मागणी वडिलांकडे केली. त्याचा राग येऊन संश्यित पंढरीनाथ याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जनावरांच्या गोठ्यात असलेल्या रोगर किटकनाशकाची भरलेली बाटली आणून मुलीच्या तोंडात बळजबरीने ओतण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत भावाने म्हटले आहे.काही दिवसांपुर्वीच आपल्या स्वत:च्या १४महिन्यांच्या चिमुकलीला आईनेच विनाकारण ठार मारल्याची घटना औरंगाबादरोडवर आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. तसेच काही महिन्यांपुर्वी रूग्णालयातच अवघ्या तीन ते चार दिवसांच्या नवजात चिमुरडीचा जन्मदात्री आईने गळा आवळून खून केल्याचीही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर शिंदे गावातील या घटनेने पुन्हा एकदा आई-वडिलांच्या नात्याला काळीमा फासण्याचा प्रयत्न केल्याने संताप व्यक्त होत आहे.२ याप्रकरणी पुढील तपास सहायक निरिक्षक के.एल.सोनोने करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी