शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नवविवाहितेला ठार मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:13 IST

मोबाइलवर कुठल्या मुलीशी चॅटिंग करतात, असे विचारल्याचा राग आल्याने दोन महिन्यांपूर्वी विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती, सासू व नणंदविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड : मोबाइलवर कुठल्या मुलीशी चॅटिंग करतात, असे विचारल्याचा राग आल्याने दोन महिन्यांपूर्वी विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती, सासू व नणंदविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  देवळालीगाव पाटील गॅरेज जवळील चंदनवाडी येथील विवाहिता ज्योती दीपक साठे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या २५ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजता माझे पती हे मोबाइलवरून मोरे आडनाव असलेल्या मुलीसोबत चॅटिंग करीत होते. नेहमी ते चॅटिंग करत असल्याने तुम्ही कोणाला व का एसएमएस करतात असे विचारल्याचा राग आल्याने पती दीपक साठे याने डोक्याचे केस पकडून छातीवर मारहाण केली. त्यानंतर प्लॅस्टिकच्या बाटलीमधून अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यावेळी सासू मुक्ताबाई यांनी मला पकडून ठेवले तर नणंद राणी हिने घराच्या दरवाजाची आतून कडी लावून घेतली.  पेटवून दिल्याने मी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे नागरिक जमा झाले. त्यानंतर जखमी अवस्थेत पती दीपक व सासू यांनी मला रिक्षातून बिटको रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. यावेळी पती व सासूने आमच्या विरोधात तक्रार केली तर तुझ्या दोन्ही मुलींना मारून टाकू, असा दम दिला. त्यामुळे पोलीस व कार्यकारी दंडाधिकारी यांना मी खोटा जबाब दिला. खासगी रुग्णालयात उपचार करून माहेरी गेल्यानंतर विवाहिता ज्योतीने खरा प्रकार आई व भावाला सांगितला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पती, सासू व नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा