शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; चौघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 01:07 IST

पत्नी दुसऱ्यासोबत विवाह करण्याच्या तयारीत असल्याचे समजून संबंधित तरुणाच्या मागे तलवार घेऊन धावणाºया इसमाला पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

इंदिरानगर : पत्नी दुसऱ्यासोबत विवाह करण्याच्या तयारीत असल्याचे समजून संबंधित तरुणाच्या मागे तलवार घेऊन धावणाºया इसमाला पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.फिर्यादी संतोष सोमवंशी यांच्या घरी जेवणाचा कार्यक्र म होता. त्यामुळे त्यांची मामेबहीण ही कुटुंबीयांसह आली होती. रात्री १२ वाजेच्या सुमारास सोमवंशी यांच्या घरी चुलत भावाबरोबर संशयित शशिकांत आढाव आला व त्याने त्यांच्या मामेबहिणीला दमबाजी करत ‘तू येथे काय करतेस’ असा जाब विचारत रागाने घरातून निघून गेला, मात्र सोमवंशी कुटुंबीयांसमवेत घरात बसलेले असताना संशयित आढाव पुन्हा त्याच्या दोन साथीदारांसह त्यांच्या घरात प्रवेश केला. सोमवंशी यांच्यावर लाकडी दंडुक्याने हल्ला चढविला. तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत सोमवंशी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या दिशेने ‘वाचवा वाचवा...’ असे ओरडत धावू लागले. यावेळी संशयित आढाव हा त्याच्या साथीदारांसह चारचाकी वाहनातून भरधाव वेगाने त्यांचा पाठलाग करत असताना वाहनाची धडक पथदीपाला बसली. यावेळी आढाव याने हातात तलवार घेत वाहनातून खाली उतरत थेट पोलीस ठाण्याजवळच सोमवंशी यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केलाच्या गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक पाटील यांच्या सदर प्रकार लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ हस्तक्षेप केला. सोमवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आढावसह त्याचा साथीदार संदीप ऊर्फ बंटी आढाव (३१), सिद्धार्थ थोरात (२७), शुभम गायकवाड (१९), प्रतीक आढाव (१९, सर्व रा. शिर्डी) यांना अटक केली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी