शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव बसस्थानकावर विवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 17:43 IST

चौघे संशयित फरार : सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे शोध सुरू

ठळक मुद्देसदर घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याची चर्चा

नाशिक : हिंगणघाट येथील एका तरुण प्राध्यापिकेला जाळून मारण्याच्या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत असतानाच जिल्ह्यातील लासलगाव बसस्थानकावर निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक येथील एका विवाहितेवर पेट्रोल टाकून पेटवून देत जाळून मारण्याचा प्रयत्न घडल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले. सदर घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याची चर्चा असून बसस्थानकातील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी चार अज्ञात संशयितांचा शोध सुरू केला आहे.लासलगाव बसस्थानकावर पिंपळगाव नजीक येथील एक विवाहित महिला रसवंतीगृहाजवळ बसची वाट पाहत थांबली होती. यावेळी अचानक चार संशयितांनी बसस्थानकात येत सदर महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकाराने सदर महिला गंभीर भाजली असून तिला तातडीने लासलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सदर महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारार्थ नाशिकला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तत्काळ बसस्थानकावर धाव घेत सीसीटीव्हीच्या फूटेजच्या आधारे तपासाला गती दिली असून चारही संशयितांच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे. सदर प्रकार हा पूर्ववैमनस्यातून घडल्याची चर्चा सुरू असून नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी