शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड तालुक्यात पानी फाउण्डेशनचे काम करणाऱ्या ग्रामस्थांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 01:55 IST

चांदवड तालुक्यातील मतेवाडीजवळ (शिवाजीनगर) असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी पानी फाउण्डेशनच्या स्पर्धेअंतर्गत ग्रामस्थांमार्फत जलसंधारणाचे काम सुरू असताना शुक्रवारी (दि. ३) सकाळी ६ वाजेच्या सुमारास तेथेच गेल्या आठ वर्षांपासून राहणाºया व जमीन कसणाºया आदिवासींनी कामास विरोध करत गलूर-गोफण आणि लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढविला. आदिवासींनी कार्यकर्त्यांच्या गाड्यांचीही मोडतोड करत त्या पेटवून दिल्या. या हल्ल्यात सात कार्यकर्ते जखमी झाले असून, त्यांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगाड्यांची जाळपोळ

चांदवड : तालुक्यातील मतेवाडीजवळ (शिवाजीनगर) असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी पानी फाउण्डेशनच्या स्पर्धेअंतर्गत ग्रामस्थांमार्फत जलसंधारणाचे काम सुरू असताना शुक्रवारी (दि. ३) सकाळी ६ वाजेच्या सुमारास तेथेच गेल्या आठ वर्षांपासून राहणाºया व जमीन कसणाºया आदिवासींनी कामास विरोध करत गलूर-गोफण आणि लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढविला. आदिवासींनी कार्यकर्त्यांच्या गाड्यांचीही मोडतोड करत त्या पेटवून दिल्या.या हल्ल्यात सात कार्यकर्ते जखमी झाले असून, त्यांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मतेवाडी शिवारात पानी फाउण्डेशनच्या वतीने चर खोदण्याचे व कुंटू बांध बांधण्याचे काम गावकऱ्यांनी सुरू केले असता सकाळी ६ वाजेच्या सुमारास संश्यितांनी कामगारांवर गलूर, गोफण व काठ्या-लाठ्याच्या साह्याने हल्ला केला. हा वाद इतका विकोपाला गेला की, या आदिवासींनी पानी फाउण्डेशनच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांच्या ८ ते ९ गाड्यांची मोडतोड करत त्या पेटवून दिल्या. तसेच जेसीबीचीदेखील तोडफोड केली. हल्ल्यात भाऊराव राघो चव्हाण, जिजाबाई भाऊराव चव्हाण, सुरेखा दगू मते, संतोष बबन मते, सागर शिवाजी कावळे आदी जखमी झाले, तर जेसीबी आॅपरेटर मोटू प्रमाद व त्याचा सहकारी मुन्ना शहा हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहायक सचिन साळुंखे, उपनिरीक्षक विशाल सनस पोहचले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणासाठी दंगा नियंत्रण पथकाला पाचारण केले. मात्र अदिवासी लोक त्याच जागेवर ठिय्या मांडून बसलेले होते.पानी फाउण्डेशनच्या स्पर्धेअंतर्गत हा हल्ला झाल्याने फाउण्डेशनच्या उपक्रमाला धक्का पोहोचला असून, स्वयंसेवकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी ५० जणांविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी